भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराचा आज ४१वा वाढदिवस. नेहराने १९९९ ते २०१७ या काळात भारतीय संघाकडून क्रिकेट खेळले.
– आशिष नेहरा १८ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. १९९९ साली नेहराने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
– नेहराने १७ कसोटी सामन्यात ४४ विकेट्स घेतल्या.
-नेहरा भारताकडून १२० वनडे सामने खेळला. त्यात त्याने १५७ विकेट्स घेतल्या.
– आशिष नेहराने २००३च्या विश्वचषकात २३ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या होत्या. ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
-नेहराने भारताकडून २७टी२० सामने खेळले. त्यात त्याने ३४ विकेट्स घेतल्या.
-वेगवेगळ्या लीग ट्वेंटी ट्वेंटी आणि टी२० मिळून नेहरा १३२ सामने खेळला. ज्यात त्याने १६२ विकेट्स घेतल्या.
-नेहराने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण २३५ विकेट्स घेतल्या आहेत.
-१ नोव्हेंबर २०१७ रोजी आशिष नेहरा फिरोजशाह कोटला स्टेडियम, दिल्ली येथे शेवटचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला.
अन्य वाचनीय लेख-
– तेव्हा सचिनच्या आईने पाहिला होता सचिन खेळलेला पहिला आंतरराष्ट्रीय सामना
– सचिन नाही तर हे आहेत लाॅर्ड्सवर शतक करणारे ५ मराठमोळे मुंबईकर क्रिकेटपटू
–सचिनच्या नावावर जरी धावा असल्या तरी हटके विक्रम आहेत कूकच्याच नावावर