भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा आणि माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुली हे दोघे भारतीय संघासाठी एकत्र खेळले आहेत. आशिष नेहरा सौरव गांगुलींच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा एक महत्वाचा भाग होता. नेहराने गांगुलींच्या नेतृत्वात खेळताना नेहमी घडत असणारा एक किस्सा सांगितला आहे. त्यावेळी कर्णधार गांगुलीला खेळाडू काहीही म्हटले, तरी ते कसलीच प्रतिक्रिया देत नसायचे, असा खुलासा नेहराने केला आहे. नेहराने यावेळी गांगुलीचे कौतुकही केले आहे.
नेहराच्या मते गांगुलींना काहीही म्हटले तरी, ते काहीच प्रतिक्रिया देत नसायचे. मात्र, सामना संपल्यानंतर रात्री त्यांच्या रूममध्ये बोलावून घ्यायचे आणि समजावून सांगायचे. नेहरा म्हणाला की, “सर्वात महत्वाची गोष्ट मी दादांकडून शिकलो ती ही आहे की, कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला शांत कसे ठेवायचे. ते एक असे व्यक्ती होते की, तुम्ही त्यांना काहीली बोला, ते प्रतिक्रिया दोत नव्हते. ते तुम्हाला खूप आरामात ऐकून घ्यायचे, पण त्याचे उत्तर देत नव्हते. मी त्यांच्यावर खूप नाराज राहायचो. ते मैदानावर काहीच बोलत नसायचे आणि नंतर रात्री म्हणायचे की, आशू काय करत आहे, माझ्या रूममध्ये ये.”
नेहराच्या मते गांगुली मैदानावर घडलेल्या गोष्टींना त्याच ठिकाणी सोडायचे आणि मैदानाबाहेर किंवा ड्रेसिंग रूममध्ये त्यांना कधीच आणत नसायचे.
“एक गोष्टी जी मी सौरव गांगुलीकडून शिकलो की, मैदानावरील राग त्याच ठिकाणी सोडून आले पाहिजे आणि त्याला बाहेर आणले नाही पाहिजे. तुम्हाला माहित आहे की, मैदानावर रागामध्ये खूप गोष्टी घडतात, पण त्यांना मनावर कधीच घेतले नाही पाहिजे. त्यांना प्रत्यक्षात माहित होते की, संघाला कसे चालवले जाते आणि कोणत्या खेळाडूकडून काय पाहिजे. ते याविषयीही एकदम स्पष्ट होते. जर कोणता खेळाडू त्यांच्यावर नाराज असेल, तर ते त्या गोष्टीला मनावर घेत नसायचे,” असेही नेहरा पुढे बोलताना म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुजीबसाठी भारतीयांनी देव ठेवले पाण्यात; ट्विटरवर होतोय ट्रेंड
-भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणतोय, “विराट बुर्ज खलिफा, तर धोनी बुर्ज अल अरब”
-‘बुमराह असावा भारताचा पुढील कर्णधार’; ‘हे’ कारण देत दिग्गजाने वाढवली यादी