---Advertisement---

आशिष नेहरा परत आणणार कोहिनूर हिरा? सोशल मीडियावर रंगली एकच चर्चा; संपूर्ण योजनाच आली समोर

On: मंगळवार, ऑक्टोबर 25, 2022 4:56 PM
ashish-nehra
---Advertisement---

संपूर्ण भारतात व जगभरात दिवाळीचा सण साजरा होत असताना भारतीयांसाठी इंग्लंडमधून एक आनंदाची बातमी आली. सोमवारी (24 ऑक्टोबर) इंग्लंडचे नवे पंतप्रधान म्हणून भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak} हे लवकरच शपथ घेतील. ऋषी यांचे नाव जाहीर होताच सोशल मीडियावर भारताचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा (Ashish Nehra) हा अचानकपणे चर्चेत आला.

लिस स्ट्रस यांनी राजीनामा दिल्यानंतर ब्रिटनचे पुढील पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक यांच्या नावाची चर्चा होती. त्यानंतर इतर विरोधकांनी माघार घेतल्याने आता ऋषी यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ऋषी यांचे नाव दिवसभरात चर्चेत असताना भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा हादेखील ट्रेंडिंगवर आला. याचे कारण म्हणजे ऋषी आणि नेहरा यांचा चेहरा जवळपास सारखा आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर या दोघांच्या नावाची चर्चा होतेय.

https://twitter.com/Srkdaanish555/status/1584588398748004352?t=tjgqhdamuxdeBCljEuJ6Lw&s=19

 

अनेकांनी नेहरा यालाच थेट ब्रिटनचा पुढील पंतप्रधान म्हणून शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. एका चाहत्याने लिहिले, ‘दिग्गज क्रिकेटपटू, समालोचक, यशस्वी प्रशिक्षक आणि आता ब्रिटनचे पंतप्रधान. अभिनंदन आशिष नेहरा’

 

एका चाहत्याने तर थेट भारताचा कोहिनूर हिरा इंग्लंडमधून भारतात आणण्याची योजना सांगितली. त्याने लिहिले,

‘आता आपण सुनक यांना भारतात आमंत्रित करूया. त्यानंतर त्यांना काही दिवस बंदी बनवून ठेवू. त्या बदल्यात आशिष नेहरा याला इंग्लंडचा पंतप्रधान बनवून पाठवू. तो तिथे गेल्यानंतर कोहिनूर हिरा भारतात आणण्याचे विधेयक मंजूर करेल. यापेक्षा चांगली योजना असू शकत नाही.”

ऋषी सुनक यांचे आजोबा स्वातंत्र्यपूर्वकाळात सध्या पाकिस्तानात असलेल्या गुजरानवाला येथील रहिवासी होते. मात्र त्यांच्या वडिलांचा जन्म केनियात झाला. ऋषी यांचा जन्म इंग्लंडमधील साऊथॅम्पटन येथे झाला असून, तेथून ते तीन वेळा निवडून आले आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘त्याला जास्त वेळ शांत ठेवणे म्हणजे…’, वाचा विराटविषयी ब्रेट ली काय म्हणाला
विराटची ऑस्ट्रेलियात विक्रमांची माळ! ‘हा’ पराक्रम तुम्हाला नक्कीच माहिती नसणार 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---