जुन महिन्यातील आपल्या अप्रतिम प्रदर्शनासाठी श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा आणि ऑस्ट्रेलियाचा ऍशले गार्डनर यांना महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडले गेले. आयसीसीचा प्लेअर ऑफ ध मंथ पुरस्कार या दोघांना दिला गेला. झिम्बाब्वेमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषक 2023च्या क्वॉलिफायर सामन्यांमध्ये हरसंगाने, तर महिला ऍशेस मालिकेत गार्डनरने केलेल्या प्रदर्शनासाठी त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.
मागच्या महिन्यात वानिंदू हसरंगा () याने श्रीलंकन संघासाठी 10च्या सरासरीने 26 विकेट्स घेतल्या. त्याने विश्वचषक क्वॉलिफायर सामन्यात श्रीलंकन संघाच्या पहिल्या सामन्यासाठी यूएईविरुद्ध सहा विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर ओमान आणि आयर्लंडविरुद्ध त्याने 13 आणि 79 धावा खर्च करून प्रत्येकी पाच-पाच विकेट्स घेतल्या. वानिंदू हसरंगा यादरम्यान वनडे क्रिकेटच्या इतिहासात सलग तीन सामन्यांमध्ये पाच विंका त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला. श्रीलंकन संघाच्या प्रबाथ जयसूर्या याने जुलै 2022मध्ये हा पुरस्कार जिंकला होता. हसरंगा त्यानंतर 11 महिन्यांनी संघासाठी हा पुरस्कार जिंकू शकला. झिम्बाब्वेचा सीन विलियम्स आणि ऑस्ट्रेलियाचा ट्रेविस हेड या दोघांवर मात करत हसरंगाने हा पुरस्कार पटकावला आहे.
दुसरीकडे ऍशले गार्डनर () हिला महिला ऍशेस 2023 हंगामातील आपल्या प्रदर्शनासाठी हा पुरस्कार दिला गेला. तिच्या प्रदर्शनाच्या जोरावर ऑसट्रेलियन महिला संघाने ऍशेस कसोटी 89 धावांनी जिंकली. गार्डनरने ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात 40 धावा केल्या आणि त्यानंतर चार विकेट्स देखील घेतल्या. पहिल्या डावानंतर इंग्लंड संघ आघाडीवर होता. गार्डनर दुसऱ्या डावात फलंदाजीत अपयशी ठरली, पण गोलंदाजी करताना तिने तब्बल 8 विकेट्स घेतल्या. यादरम्यान तिच्या हातून 66 धावा खर्च झाल्या. तिने इंग्लंडच्या टॅमी ब्युमोंट आणि वेस्ट इंडीजच्या हेली मॅथ्यूज यांना पछाडत हा पुरस्कार नावावर केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग 12: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला ‘मुनाफ पटेल’
WIvsIND । वेस्ट इंडीजविरुद्ध जडेजा मोडणार सर्व विक्रम! कुंबळे आणि कपिल निशाण्यावर