काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Austrelia vs England) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ऍशेस मालिका (Aahes series) पार पडली. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड संघाला ४-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता. या निराशाजनक कामगिरी नंतर इंग्लंड संघाने मालिका तर गमावली, यासह संघातील प्रमुख सदस्याने राजीनामा देखील दिला आहे.
गेल्या ३ वर्षांपासून इंग्लंड संघाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असलेले ऍश्ले जाइल्स (Ashely Giles) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने अधिकृतरीत्या ही माहिती दिली आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉस (Andrew Strauss) ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी सज्ज झाला आहे. तो तात्पुरत्या स्वरूपात ही जबाबदारी पार पाडणार आहे. इंग्लंड संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याची जबाबदारी अँड्र्यू स्ट्रॉसवर असणार आहे. त्यानंतर पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी पार पाडण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड केली जाईल.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डचे (ECB) मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरीसनने जाइल्स यांचे आभार मानत म्हटले की, “जाईल्सने गेल्या तीन वर्षात इंग्लंडच्या पुरुष क्रिकेटमध्ये केलेल्या कामाबद्दल आणि त्याने दाखवलेल्या बांधिलकीबद्दल मी त्याचा आभारी आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने काही घवघवीत यश मिळवले. ज्यामध्ये २०१९ वनडे विश्वचषक जिंकणे हे सर्वात मोठे यश आहे. इंग्लिश क्रिकेटमधील कठीण काळात त्याने संघाला सांभाळले.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “त्यांना या खेळात खूप मान दिला जातो. त्यांनी ईसीबी आणि पुरुष क्रिकेटमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. यावेळी ऍशेस मालिकेत केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर पुढे त्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे.”
तसेच जाईल्स यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले की, ” गेली काही वर्षे खूप आव्हानात्मक होती. मला अभिमान आहे की, कठीण परिस्थितीतही आम्ही चांगली कामगिरी करू शकलो. आता पुढील जबाबदारी घेण्यापूर्वी मी कुटुंबासोबत वेळ घालवणार आहे.”
महत्वाच्या बातम्या :
‘रोहितसेने’तून बाहेर असलेल्या अश्विनचा अनोखा प्रयोग, एका हाताने फलंदाजीचा करतोय सराव- Video
आयपीएलने पालटले सिराजचे आयुष्य, पहिल्या कमाईतून कुटुंबासाठी घेतलेली सेकंड हॅंड कार; तर स्वतःसाठी…
टी२० सामन्यात चहलने दिल्या तब्बल ६४ धावा, तरीही कॅप्टन धोनीने दिली ‘कूल’ प्रतिक्रिया; वाचा किस्सा