कोलकाता येथे सुरू झालेल्या निवृत्त क्रिकेटपटूंच्या लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये इंडिया कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्या दरम्यान पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात संघ अडचणीत असताना इंडिया कॅपिटल्ससाठी खेळणाऱ्या वेस्ट इंडीजच्या माजी अष्टपैलू ऍश्ले नर्सने तुफानी नाबाद शतक झळकावत संघाला 179 धावांपर्यंत मजल मारून दिली.
A sensational 100 from #AshleyNurse as he takes @GujaratGiants bowlers for a toll.
The maiden hundred of #LLCT20 unlocked!!@CapitalsIndia#BossLogonKaGame #LegendsLeagueCricket #LLCT20 pic.twitter.com/7tmJlnpxpn— Legends League Cricket (@llct20) September 17, 2022
नाणेफेक गमावून इंडिया कॅपिटल्स संघाला प्रथम फलंदाजी संधी मिळाली. नियमित कर्णधार गौतम गंभीरच्या अनुपस्थितीत जॅक कॅलिसने संघाचे नेतृत्व केले. मात्र, त्यांचे आघाडीचे चार फलंदाज केवळ 34 धावांवर माघारी परतले होते. अशा परिस्थितीत नर्स याने संघाची जबाबदारी खांद्यावर घेतली. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत किल्ला लढवला. 43 चेंडूंमध्ये आठ चौकार आणि नऊ षटकार ठोकत त्याने नाबाद 103 धावांची तुफानी खेळी केली. स्पर्धेच्या यावर्षीच्या हंगामातील हे पहिले शतक ठरले.
या सामन्यातील इंडिया कॅपिटल्स संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर हॅमिल्टन मासाकात्झा व सोलोमन मीरे हे दोन्ही झिम्बाब्वेचे खेळाडू अनुक्रमे 7 व 9 धावांवर बाद झाले. कर्णधार कॅलीस आणि सुहेल शर्मा यांना खातेही खोलता आले नाही. त्यानंतर दिनेश रामदिन व नर्स यांची जोडी जमली. दोघांनी संघाला अडचणीतून बाहेर काढले. रामदिनने 31 धावांचे योगदान दिले. तो बाद झाल्यानंतर पूर्णपणे संघाची जबाबदारी नर्सने खांद्यावर घेऊन षटकार चौकारांची आतिषबाजी केली. अवघ्या 43 चेंडूंमध्ये त्याने 8 चौकार व 9 षटकार ठोकत शतक साजरे केले. यावर्षीच्या हंगामातील पहिले शतक ठरले. या शतकाच्या बळावर इंडिया कॅपिटल्सने 179 धावा उभारल्या. गुजरातसाठी इमरित, अपन्ना व परेरा यांनी प्रत्येक हे दोन बळी मिळवले.