भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज आणि रणजी ट्रॉफी स्पर्धेत बंगालकडून खेळलेल्या अशोक दिंडाने बंगाल क्रिकेट असोसिएशनविरोधात बरीच वादग्रस्त विधाने केली आहेत. रविवारी (२१ जून) दिंडाने बंगाल क्रिकेट असोसिएशनविरोधात एक विधान देत स्पष्ट केले, की येत्या देशांतर्गत स्पर्धेत आता तो बंगालऐवजी नव्या संघाबरोबर खेळणार आहे.
गेल्या वर्षी रणजी ट्रॉफी सत्रादरम्यान बेशिस्तीच्या कारणास्तव दिंडाला (Ashok Dinda) चालू मोसमाच्या मध्यातून वगळण्यात आले होते. त्यानंतर दिंडा म्हणाला, बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या राजकारणामुळे त्याच्या बाबतीत हे घडले आहे.
या मोसमात दिंडाने जोरदार पुनरागमन करण्याविषयी बोलताना सांगितले, की सुशांत सिंग राजपूत ज्याप्रमाणे चित्रपटसृष्टीच्या राजकारणाचा बळी ठरला. त्याचप्रकारे मलाही बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या राजकारणाचा बळीचा बकरा बनवला गेला आहे.
आंध्राविरुद्धच्या सामन्याच्या एक दिवस आधी दिंडाला बंगालच्या रणजी ट्रॉफी संघातून वगळण्यात आलं होतं. कारण त्याने गोलंदाज प्रशिक्षकाबरोबर गैरवर्तन केलं होतं. बंगाल क्रिकेट असोसिएशनने यानंतरच्या बैठकीत हा निर्णय घेतला होता.
त्याने आतापर्यंत भारतीय संघाकडून १३ वनडे सामने आणि ९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने वनडेत १२, तर टी२०त १७ विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने ११६ प्रथम श्रेणी सामन्यांत ४२० विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-“…तर मी भारतीय संघातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू होऊ शकलो असतो”
-तो दादाच आहे… अगदी ट्विटरवरही इंग्लडच्या नासीर हुसेनला ठरला भारी
-‘या’ क्रिकेटपटूचा झाला कार अपघात; डोक्याला लागला मार