---Advertisement---

अशोक दिंडा रिटायर! भलेही निवृत्तीचा धक्का बसला नसेल, पण त्याचा ‘हा’ विक्रम पाहून ४४० व्होल्टचा शॉक लागेल

On: बुधवार, फेब्रुवारी 3, 2021 8:17 AM
---Advertisement---

भारताचा वेगवान गोंलंदाज अशोक डिंडाने मंगळवारी (२ फेब्रुवारी) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. देशांतर्गत क्रिकेटमधील एक दिग्गज गोलंदाज म्हणून डिंडाला ओळखले जाते. कारकरिर्दीतील अनेक वर्षे बंगालसाठी खेळलेल्या डिंडाने यावर्षी गोव्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले. नुकतीच पार पडलेली सईद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी त्याची शेवटची स्पर्धा ठरली. डिंडाने त्याच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीत एक खास विक्रमही केला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र, तो शेवटचे ७ वर्षांपूर्वी खेळला आहे. जानेवारी २०१३ साली इंग्लंडविरुद्ध खेळलेला वनडे सामना त्याचा कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना सामना होता. त्याने भारताकडून १३ वनडे सामने आणि ९ टी-२० सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करत असताना त्याने अनुक्रमे १२ आणि १७ विकेट्स घेतले आहेत.

त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द जास्त बहरली नसली तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने भरीव कामगिरी केली आहे. तो गेल्या ९ हंगामातील ८ हंगामात बंगालकडून रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. याबाबत रोहन गावसकर यांनीही ट्विट करत माहिती दिली आहे.

साल २०१०-११ च्या हंगामापासून २०१८-१९ सालच्या हंगामापर्यंत ९ वेळा रणजी ट्रॉफीचे आयोजन झाले. त्यातील ८ वेळा बंगालकडून सर्वाधिक विकेट्स डिंडाने घेतले. या ९ वर्षांच्या कालावधीत केवळ २०१२-१३ चा हंगाम असा होता, ज्यात डिंडाला बंगालकडून सर्वाधिक विकेट्स घेता आल्या नाहीत. त्या हंगामात मोहम्मद शमीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या.

https://twitter.com/rohangava9/status/1356646615218536448

डिंडाची कामगिरी – 

डिंडाने त्याच्या कारकिर्दीत ११६ प्रथम श्रेणी सामन्यात २८.२८ च्या सरासरीने ४२० बळी घेतले आहेत. १२३ धावांत ८ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने २६ वेळा एका डावात ५ बळी घेण्याची कामगिरी केली आहे. तर ५ वेळा सामन्यात १० विकेट्स घेण्याची कामगिरी त्याच्या नावे आहे. त्यातील ९० प्रथम श्रेणी सामने त्याने बंगालसाठी खेळले असून यात त्याने २७.५३ च्या सरासरीने ३३९ विकेट्स घेतल्या आहेत. तो बंगालकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.

याशिवाय डिंडाने ९८ अ दर्जाच्या क्रिकेट सामन्यांमध्ये १५१ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट प्रकारात डिंडाने १४७ सामन्यात १५१ विकेट्स घेतल्या आहेत. त्यातील ७८ आयपीएल सामन्यांमध्ये त्याने ६९ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

टेस्ट चॅम्पियनशिप : न्यूझीलंड तर फायनलमध्ये पोहचले आता भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियासाठी ‘अशी’ आहेत समीकरणे

“रिषभ पंतचा खेळ पाहून बहुधा हृदयविकाराचा झटकाही येईल”, भारतीय संघाच्या सदस्याचे गमतीशीर विधान

हार्दिकला येतेय वडिलांची आठवण, शेअर केला भावनिक व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---