पुणे – अशोका इलेव्हन आणि उत्कर्ष क्रीडा मंच ब (युकेएम) यांनी संघर्षपूर्ण विजयासह पीडीएफए लीग स्पर्धेतील आपले गुणांचे खाते उघडले.
सप महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या सी गटातील सामन्यात युकेएम ब संघाने गोल्फा बुशरेंजर्सचा २-१ असा पराभव केला. शंकर सौंद याने २०व्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. त्यानंतर त्यांना दुसऱ्या गोलसाठी उत्तरार्धाची वाट पहावी लागली. या दरम्यान पुनित गेहलोत याने ४६व्या मिनिटाला गोल करून सामना बरोबरीत आणला होता. उत्तरार्धात सामन्याच्या ५२व्या मिनिटाला गुणवंत पाटिल याने विजयी गोल केला. बुश रेंजर्सचा स्पर्धेतील हा सलग दुसरा पराभव ठरला.
डी गटातील सामन्यात अशोका इलेव्हानने न्यू इंडिया सॉकरचा १-० असा पराभव केला. पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर सामन्याच्या ४७व्या मिनिटाला अभिषेक सिंग याने एकमात्र विजयी गोल केला. न्यू इंडिया सॉकरचा हा दोन सामन्यातील पहिलाच पराभव ठरला.
याच गटातील अन्यएका सामन्यात युनिक वानवडीने सुखाई स्पोर्ट क्लबला २-० असे हरवले. वानवडी संघाकडून राहुल चव्हाण चाने २६ आणि सॅव्हियो जे याने ४९व्या मिनिटाला गोल केला. वानवडीचा हा पहिला विजय ठरला, तर सुखाईला दुसऱ्या सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला.
निकाल –
सप महाविद्यालय – द्वितीय श्रेणी – गट सी –
केशव माधव प्रतिष्ठान (केएमपी) पुढे चाल वि. वानवडी स्पोर्टस
उत्कर्ष क्रीडा मंच ब २ (शंकर सौद २०वे, गुणवंत पाटिल ५२वे मिनिट)वि.वि. गोल्फा बुशरेंजर्स १ (पुनित गेहलोत ४६वे मिनिट)
गट ड –
युनिक वानवडी २ (राहुल चव्हाण २६वे मिनिट, सॅव्हियो जे. ४९वे मिनिट)वि.वि. सुखाई एफसी ०
अशोका इलेव्हन १ (अभिषेक सिंग ४७वे मिनिट) वि.वि. न्यू इंडिया सॉकर ०
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाबविरुद्धची मॅच गमावत आरसीबीच्या अपेक्षांना झटका, आता प्लेऑफमध्ये कसा पोहोचणार फाफचा संघ?