---Advertisement---

टीम इंडिया विरुद्धच्या वन-डे मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का!

---Advertisement---

कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात 3 वन-डे सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 12 जानेवारीला सिडनी येथे होणार आहे.

या मालिकेआधीच ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्श हा दुखापतीमुळे संघाबाहेर पडला आहे. त्याच्या जागी एश्टन टर्नरला संधी देण्यात आली आहे.

मार्श पोटदुखीमुळे दोन दिवस हॉस्पिटलमध्ये होता असे cricket.com.auने सांगितले आहे.

ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी मार्श हा पहिल्या सामन्यात खेळणार नाही हे स्पष्ट केले आहे. तर पुढील दोन सामन्यासाठी त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे, असेही सांगितले आहे.

टर्नरने बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉरचर्सकडून खेळताना मेलबर्न स्टार्स विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने 22 चेंडूमध्ये 43 धावा केल्या होत्या. पर्थने हा सामना सहा विकेट्सने जिंकला होता.

25 वर्षीय टर्नरने ऑस्ट्रेलिया संघात 2017ला पदार्पण करताना 3 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 26 धावा करत 3 विकेट्स घेतल्या आहेत.

या वन-डे मालिकेतील दुसरा सामना 15 जानेवारीला अॅडलेड तर तिसरा सामना 18 जानेवारीला मेलबर्न येथे होणार आहे.

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ-

ऍरॉन फिंच(कर्णधार), उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पिटर हँड्सकॉम्ब, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनीस, एश्टन टर्नर, ऍलेक्स कॅरे(उपकर्णधार), झे रिचर्डसन, बिली स्टॅनलेक, जेसन बर्हेनडॉर्फ, पिटर सिडल, नॅथन लायन, ऍडम झम्पा.

महत्त्वाच्या बातम्या-

संपुर्ण वेळापत्रक: असा असेल फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारा ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

अमिरीती विरुद्ध भारताला दक्ष राहण्याची गरज

आयपीएल गाजवलेल्या दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटूचा सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा…

जेव्हा ३४३ धावांचे लक्ष दिलेला संघ होतो ३५ धावांवर सर्वबाद

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment