भारत एक खूप मोठा देश आहे आणि या देशाचा क्रिकेट सर्वात लोकप्रिय खेळ आह. देशाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक गल्ली गल्ली मध्ये छोट्यांपासून मोठी माणसेही क्रिकेट खेळतात. तसेच आज क्रिकेटच्या खेळात प्रतिस्पर्धी म्हणजेच स्पर्धा खूप वाढली आहे. तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाचा स्टार खेळाडू आशुतोष शर्मा सुद्धा अशाच एका संघर्षा मधून गेला आहे. त्याने 2017 मध्ये एका टी20 स्पर्धेदरम्यान मध्यप्रदेश संघासाठी पदार्पण केलं होतं. 2019-20 हंगामादरम्यान त्याने लिस्ट ए डेब्यू सुद्धा केलं होतं. त्याचबरोबर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सुद्धा तो खेळलेला आहे.
2020 मध्ये चंद्रकांत पंडित यांना मध्य प्रदेश संघाचा प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले होते. सध्या ते आयपीएल मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे हेड प्रशिक्षक सुद्धा आहेत. इंडिया टुडे नुसार, आशुतोषने खुलासा केला होता की, सातत्याने चांगले प्रदर्शन करून सुद्धा त्याला संघामधून बाहेर करण्यात येत होतं. आशुतोषच म्हणणं होतं की, नव्या प्रशिक्षकांना तो आवडत नव्हता आणि चांगलं खेळून सुद्धा ते त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते.
आशुतोषने सांगितले की, मध्य प्रदेशसाठी 2019 मध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या टी20 सामन्यात त्याने 84 धावा केल्या होत्या. त्यादरम्यानच एक नवीन प्रशिक्षक आले होते, जे कदाचित मला पसंत करत नव्हते. सिलेक्शन ट्रायल मध्ये सुद्धा मी 40-45 चेंडूत 90 धावा केल्या होत्या. तरीसुद्धा मला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी संघामध्ये निवडण्यात आले नव्हते. त्यावर्षी मी खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं. माझी निवड न केल्यामुळे मी डिप्रेशनमध्ये चाललो होतो.
पुढे आशुतोष म्हणाला , सौभाग्यने मला नंतर त्याच वर्षी रेल्वे संघासाठी खेळण्याची संधी मिळाली. त्या दरम्यान त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये 11 चेंडूत 50 धावा केल्या आहेत.






