---Advertisement---

AUS vs ENG हायव्होल्टेज सामना पाहण्यासाठी भारतीय खेळाडूंनी लावली हजेरी, अश्विनने शेअर केला फोटो

r ashwin with teammates
---Advertisement---

भारतीय संघ 16 ऑक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. संघ त्याठिकाणी पोहोचल्यानंतर ऑस्ट्रेलियन परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. संघाने सलग दोन सराव सत्र पार पाडल्यानंतर सोमवारी संघातील खेळाडू रविवारी (9 ऑक्टोबर) पर्थ स्टेडियमवर निवांत वेळ घालवताना दिसले. याठिकाणी सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 सामन्याचा आनंद घेताना रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेल यांना पाहिले गेले. 

सलग दोन दिवस सराव केल्यानंतर भारतीय खेळाडूंना विश्रांती दिली गेल्याचे सांगितले जात आहे. अशात संघातील काही खेळाडूंनी या रिकाम्या वेळेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना पाहण्यासाठी हजेरी लावली. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून ही स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये त्याच्या शेजारी हर्षल पटेल (Harshal Patel) त्यानंतर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि शेवटी दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) दिसत आहे. दरम्यान भारतीय संघ विश्वचषक सुरू होण्याआधी सध्या पर्थमध्येच थांबला आहे.

r ashwin
Photo Courtesy: Instagram/Screengrab

विश्वचषकात सहभागी होणारे बहुतांश संघ सध्या स्वतःच्या मालिका खेळत आहे. भारत देखील मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे, पण त्या संघात शिखर धवन कर्णधार आहे, तर युवा खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि संघातील वरिष्ट खेळाडूंनी मात्र ऑस्ट्रेलियात सराव सुरू केला आहे. रोहित आणि कंपनी आता विश्वचषकापूर्वी 10 आणि 13 ऑक्टोबर पर्थमध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलेव्हनसोबत सराव सामने केळायचे आहेत. त्यानंतर संघ न्यूझीलंडविरुद्ध 17 आणि 19 ऑक्टोबर रोजी ब्रिसबेनमध्ये दोन अधिकृत सराव सामने खेळेल.

टी-20 विश्वचषक 16 ऑक्टोबर रोजी सुरू होणार असून भारताला त्याच्या अभियानाची सुरुवात 23 ऑक्टोबर रोजी करायची आहे. पहिला सामना भारतीय संघ मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघासोबत खेळेल. त्यानंतर संघ दुसरा सामना 27 ऑक्टोबर रोजी खेळले. विश्वचषकाचा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्नमध्ये खेळला जाईल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
इश सोधीने रचला इतिहास, क्रिकेटविश्वात ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू
आनंदाची बातमी! 22 ग्रँडस्लॅम विजेता राफा नदाल बनला बापमाणूस, पत्नी मारियाने मुलाला दिला जन्म   

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---