---Advertisement---

IND vs ENG: अश्विनने पहिल्या कसोटीसाठी भारताची प्लेइंग 11 निवडली, सर्वाधिक विकेट्स बुमराह नव्हे तर ‘हा’ गोलंदाज घेणार

On: गुरूवार, जून 19, 2025 1:15 PM
---Advertisement---

भारताचा माजी फिरकीपटू अश्विनने पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन निवडली आहे.(Ashwin team India’s playing Elevan) अश्विनने अश्या 11 खेळाडूंची नावे घेतली आहेत, ज्यांनी पहिल्या सामन्यात भारतीय संघात असणे गरजेचे आहे. भारतीय आर अश्विनने ओपनर म्हणून के एल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांची निवड केली आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी त्याने साई सुदर्शनचे नाव घेतले. याशिवाय चौथ्या स्थानासाठी त्याने कर्णधार गिलचे नाव सुचवले. अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना ही प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.

पुढे बोलताना तो म्हणाला, 6व्या नंबरवर करूण नायर (Karun Nair) किंवा ध्रुव जुरेल (Dhruv jurel) यांच्यामधील कोणतरी एक खेळू शकतो, तसेच तुम्ही करूणच्या फॉर्मकडे दुर्लक्ष करू शकत नाही. पण मला वाटते की, जुरेल त्या ठिकाणी खेळण्याची जास्त शक्यता आहे. जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये बुमराहने खराब प्रदर्शन केले होते तेव्हा आमच्याकडे गोलंदाजीसाठी दुसरे पर्याय उपलब्ध नव्हते. तर नंबर 8 वर तुम्ही शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव किंवा दुसऱ्या कोणत्याही फिरकी गोलंदाजांला खेळवू शकता.

अश्विनने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रवींद्र जडेजा, रिषभ पंत आणि शार्दुल ठाकूरला संधी दिली आहे. त्याने अष्टपैलू नितीश कुमारची निवड केलेली नाही. त्याने शार्दुल ठाकूरला अष्टपैलू खेळाडू म्हणून निवडले आहे. अश्विनचे म्हणणे आहे की, इंग्लंडच्या खेळपट्टीवर शार्दुल यशस्वी ठरू शकतो. याशिवाय वेगवान गोलंदाज म्हणून त्याने जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांचे नाव घेतले आहे.

अश्विनची प्लेइंग इलेवन (Ashwin’s playing Elevan)
केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), करुण नायर, रिषभ पंत, रवींद्र जड़ेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

याशिवाय अश्विनने मालिकेत सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजांबद्दल भाष्य केले आहे. अश्विनचे म्हणणे आहे की, इंग्लंडचा क्रिस वोक्स सर्वात जास्त विकेट्स घेऊ शकतो. अश्विन म्हणाला, जर क्रिस वोक्सने सर्व 5 कसोटी सामने खेळले तर तो या मालिकेत सर्वात जास्त विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल. किंवा शोएब बशीर सुद्धा ठरू शकतो. यामुळे मला वाटते की, भारताकडून जर बुमराह सर्व सामने खेळणार नाही तर मला वाटते की, सिराज सर्वात जास्त विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल.

अश्विनच्या म्हणण्यानुसार, के एल राहुल (Kl Rahul) या मालिकेत भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करू शकतो. तसेच इंग्लंडसाठी त्याने जो रूटचे (Jo Root) नाव घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---