भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं (Ravichandran Ashwin) तामिळनाडू प्रिमीअर लीगमध्ये दिंडीगुल ड्रॅगन्स संघाचं नेतृत्व करताना त्यांना पहिल्यांदाच जेतेपद पटकावून दिलं. तेव्हापासून त्याच्या नेतृत्वाची चर्चा होत आहे. 2025च्या आयपीएल हंगामात अश्विन एखाद्या संघाचा कर्णधार देखील बनू शकतो. अश्विननं आयपीएलच्या 2 हंगामात पंजाब किंग्जचं नेतृत्व केलं आहे. परंतु, तो त्यांना जेतेपद मिळवून देऊ शकला नाही. पण आगामी आयपीएल हंगामात अश्विन 3 संघाचा कर्णधार बनण्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो.
दिंडीगुल ड्रॅगन्स संघाचा भाग असलेला खेळाडू बाबा इंद्रजीत म्हणाला की, जवळजवळ सर्व आयपीएल संघ अश्विनला कर्णधार करण्यासाठी विचार करतील. अश्विनकडे क्रिकेटच्या दृष्टीने उत्कृष्ट गेम आहे आणि त्याची स्वत:ची कर्णधार म्हणून आयपीएलचे जेतेपद मिळवण्याची खूप ईच्छा आहे. 2025च्या आयपीएलपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. अनेक संघ त्यांच्या कर्णधारालाही रिलीज करु शकतात. त्यासाठी असे 3 संघ आहेत, ज्यांच्यासाठी अश्विन कर्णधारपदासाठी चांगला पर्यांय ठरु शकतो.
राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB)- आरसीबीनं 2022 मध्ये फाफ डु प्लेसिसला कर्णधार केलं होतं, परंतु 2025च्या मेगा लिलावात आरसीबी त्याला रिलीज करु शकतं. शेवटच्या हंगामात पहिल्या 7 सामन्यांमध्ये आरसीबीनं 1 सामना जिंकला होता. तर शेवटच्या 7 सामन्यांमध्ये विजय मिळवून प्ले-ऑफसाठी क्वालिफाय केलं होतं. एलिमीनेटर सामन्यात त्यांना निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला होता. जर आरसीबीनं फाफ डु प्लेसिसला रिलीज केलं तर अश्विन हा त्यांच्यासाठी कर्णधार आणि अनुभवी फिरकीपटू म्हणून चांगला पर्याय ठरु शकतो.
लखनऊ सुपर जायंट्स (LSG)- 2022च्या आयपीएल हंगामात एलएसजी संघानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांनी पहिल्या दोन हंगामात प्ले-ऑफसाठी क्वालिफाय केलं होतं. परंतु शेवटच्या हंगामात त्यांच्या हाती केवळ निराशाच लागली. शेवटच्या हंगामात केएल राहुल (KL Rahul) आणि संघ मालक यांच्यामध्ये बाचाबाची पाहायला मिळाली होती. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे की, आगामी आयपीएल हंगामात एलएलजी संघ दुसऱ्या कर्णधाराच्या शोधात आहे.
पंजाब किंग्ज (PBKS)- पीबीकेएसचा संघ 2014च्या आयपीएल हंगामापासून खूपच खराब प्रदर्शन करत आहे. त्यांनी 2014 पासून प्ले-ऑफसाठी एकदाही क्वालिफाय केलं नाही. शेवटच्या दोन हंगामात पंजाबची धुरा शिखर धवनकडे होती. परंतु शेवटच्या दोन्ही हंगामात फिटनेसच्या अडचणीमुळे तो संघाचं नेतृत्व करु शकला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार म्हटलं जात आहे की, पंजाब धवनला रिलीज करु शकतं. जर पंजाबला नवीन कर्णधार हवा असल्यास त्यांच्यासाठी अश्विन उत्तम पर्याय ठरु शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंका दौऱ्यावर भारताचे हे 3 महान फलंदाज फ्लॉप, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी संघातून होऊ शकते हकालपट्टी
विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार की नाही? आज रात्री इतक्या वाजता येईल निर्णय
टीम इंडियाचा प्रशिक्षक असताना द्रविडसाठी कोणती मालिका अवघड? स्वत:च केला मोठा खुलासा