रविचंद्रन अश्विन याने धरमशालेत आपला 100वा कसोटी सामना केळला. भारताने या सामन्यात एक डाव आणि 64 धावांनी जिंकला. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारताने ही मालिका 4-1 अशा अंतराने नावावर केली. शनिवारी पहिल्या सत्रात इंग्लंडचा दुसरा डाव सुरू झाला आणि दुसऱ्या सत्रात पाहुणे सर्वबाद देखील झाले. अश्विनने सर्वाधिक 9 विकेट्स या सामन्यात नावावर केल्या. त्याचसोबत एका खास यादीत दिग्गज विराट कोहली याची बोरबीर देखील केली.
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध मायदेशातील ही कसोटी मालिका 4-1 अशा अंतराने जिंकली. मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर यजमान भारताने जरोदरा पुनरागमन केले आणि मालिका खिशात घातली. गुरुवारी (7 मार्च) भारत आणि इंग्लंड यांच्यातील धरमशाला कसोटी सुरू झाली. पहिल्या डावात कुलदीप यादव 5, तर रविचंद्रन अश्विन याने 4 विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा पहिला डाव 218 धावांवर गुंडाळला गेला. प्रत्युत्तारत भारतासाठी रोहित शर्मा (102) आणि शुबमन गिल (110) यांनी शतके ठोकली. शनिवारी इंग्लंडला दुसऱ्यांदा फलंदाजीची संधी मिळाली आणि भारतीय संघ 259 धावांनी आघाडीवर होता. पण याही वेळी भारतीय गोलंदाजांनी कमाल दाखवत अवघ्या 195 धावांवर इंग्लंडला सर्वबाद केले. अश्विनने दुसऱ्या डावात सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
सामनावीर पुरस्कार कुलदीप यादवला मिळाला. कारण दोन्ही डावांमध्ये त्याने इंग्लंडच्या प्रमुख फलंदाजांना तंबूत धाडले होते. पण रविचंद्रन अश्विनचे विजयातील श्रेय देखील महत्वाचे होते. त्याने एकूण 9 विकेट्स धरमशाला कसोटीत नावावर केल्या. अश्विन या सामन्याप्रमाणे मागच्या दशकात अनेकदा भारतासाठी मॅच विनर ठरला आहे. भारताने जिंकलेल्या कसोटी सामन्यांपैकी सर्वाधिक सामन्यांचा भाग असणाऱ्यांच्या यादीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
भारतीय संघासोबत सर्वाधिक कसोटी विजय मिळवणाऱ्यांच्या यादीत माजी दिग्गज सचिन तेंडुलकर आहे. भारतीय संघाच्या या महान फलंदाजाने संघासोबत खेळताना 72 कसोटी विजय मिळवले. यादीत दुसऱ्या क्रमांकावर रविचंद्रन अश्विन याने मजल मारली आहे. अश्विनच्या नावापुढे 59 कसोटी विजय मिळवले आहेत. कसोटी विजयांच्या बाबतीत त्याने विराट कोहली याची बरोबरी केली आहे. चेतेश्वर पुजारा या यादीत 58 विजयांसह चौथ्या क्रमांकावर आहे. राहुल द्रविड 56 कसोटी विजयांसह पाचव्या क्रमांकावर आहे. इशान किशन (46) आणि वीवीएस लक्ष्मण (47) सहा आणि सात क्रमांकावर आहेत. (Ashwin equals Virat in 100th Test match of his career! Second place in the special list)
भारतीय संघासोबत सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे क्रिकेटपटू
72 – सचिन तेंडुलकर
59 – रविचंद्रन अश्विन*
59 – विराट कोहली
58 – चेतेश्वर पुजारा
56 – राहुल द्रविड
48 – इशान किशन
47 – वीवीएस लक्ष्मण
महत्वाच्या बातम्या –
रोहित शर्मा लवकरच निवृत्ती घेणार? इंग्लंडविरुद्धच्या मालिका विजयानंतरचं वक्तव्य चर्चेत
मालिका विजय केवळ रोहितमुळे! धरमशाला कसोटी जिंकल्यानंतर काय म्हणाला राहुल द्रविड