शेख जायेद स्टेडियमवर खेळलेल्या आयपीएल २०२१ च्या ३६ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा ३३ धावांनी पराभव केला. आपल्या गोलंदाजांच्या बळावर दिल्ली संघाने हा सामना जिंकत गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. या सामन्यात अनेक गमतीदार प्रसंगही घडले आणि असाच एक प्रसंग घडला, जेव्हा रविचंद्रन अश्विन फलंदाजी करत होता.
हा किस्सा दिल्लीच्या डावाच्या शेवटच्या षटकात घडला जेव्हा रविचंद्रन अश्विनने मुस्तफिजुर रहमानला पॅडल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला. पण तो चेंडू पूर्णपणे चुकला आणि चेंडू थेट यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या ग्लोव्हजमध्ये गेला. हे शेवटचे षटक होते, त्यामुळेच अश्विनने चेंडू चुकवल्यानंतर धाव घेतली आणि संजूने कोणताही विलंब न लावता चेंडू नॉन स्ट्रायकरच्या शेवटी मुस्तफिजूरच्या हातात फेकला.
अश्विन क्रीजपासून खूप दूर होता आणि मुस्तफिझूरने चेंडू पकडला. पण त्याने चेंडू दुरूनच स्टंपवर फेकला आणि चेंडू स्टंपला लागलाच नाही. त्यामुळे दिल्लीला एक जास्तीची धाव मिळाली.
हा अतिशय साधा रन-आऊट गमावल्यामुळे राजस्थान संघाला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे. मात्र, गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर फलंदाजांनी राजस्थानची नाव बुडवण्यात कोणतीही कसर सोडली नाही आणि संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यासह राजस्थानला दोन गुणांचा नुकसानही सहन करावा लागला.
https://twitter.com/CowCorner9/status/1441755304266326021?s=20
तत्पूर्वी, दिल्लीने प्रथम फलंदाजी करत राजस्थानला १५५ धावांचं लक्ष्य दिलं होतं. हे आव्हान राजस्थानच्या संघाला पेलवलं नाही. राजस्थानकडून या सामन्यात कर्णधार संजू सॅमसनने ७० धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. त्याला राजस्थानच्या कोणत्याही फलंदाजाकडून साथ मिळाली नाही. दिल्लीच्या गोलंदाजांनी या सामन्यात टिच्चून मारा केला. दिल्लीच्या प्रत्येक गोलंदाजाने या सामन्यात योगदान दिलं. नॉखियाने या सामन्यात सर्वाधिक 2 बळी घेतले. तर कगिसो रबाडा, आवेश खान, अश्विन आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक बळी घेतला. परिणामी राजस्थानचा संघ या सामन्यात निर्धारित २० षटकात १२१ धावांपर्यंतच मजल मारु शकला. त्यामुळे राजस्थानला ३३ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सीएसकेचा हुकुमी एक्का असूनही ब्रावो अन् धोनीमध्ये सतत बिनसतं, स्वत: थालाने सांगितले यामागचे कारण
SRHvPBKS: शेवटच्या क्षणी पंजाबची बाजी, ५ धावांनी हैदराबादला दिला धोबीपछाड
नादच नाय! हुड्डाचा पूर्ण ताकदनिशी फटका अन् हैदराबादच्या पठ्ठ्याचा हवेत उडत एकहाती ‘ब्लाइंडर कॅच’






