---Advertisement---

आर अश्विनने खास ट्विट करत या विंडीज खेळाडूचे केले कौतुक

On: मंगळवार, डिसेंबर 10, 2019 10:20 AM
---Advertisement---

तिरुअनंतपुरम टी20 सामन्यात वेस्ट इंडीजकडून भारतीय क्रिकेट संघाला निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला 7 खेळाडू गमावून 170 धावा करता आल्या.

वेस्ट इंडीजने हे लक्ष्य सहजतेने गाठले आणि 8 गडी राखून विजय मिळविला. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या निकोलस पुरणने तुफानी फलंदाजी केली. यानंतर भारतीय संघाच्या आर अश्विनने त्यांचे कौतुक करून एक ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये, अश्विनने लिहिले- ‘हा खेळाडू (निकोलस पूरण) खास आहे…’ या सामन्यात, पूरनने 18 चेंडूत 2 षटकार 4 चौकारांसह 38 धावांची शानदार खेळी केली.

आर अश्विन 2018-2019 मध्ये आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा भाग होता. या दरम्यान वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरण देखील या संघाचा भाग होता. 2019 च्या आयपीएलच्या लिलावात किंग्ज इलेव्हन पंजाबने पूरनला विकत घेत त्याला संघात समाविष्ट केले.

या दरम्यान अश्विन संघाचा कर्णधार होता आणि दोघांनीही 12 व्या हंगामात ड्रेसिंग रूम शेअर केली होती. या दरम्यान, पूरणने 7 सामन्यांत 157 सरासरीने 168 धावा केल्या होत्या.

रविवारी तिरुवनंतपुरममध्ये खेळल्या गेलेल्या दुसर्‍या टी20 सामन्यात वेस्ट इंडीजने 8  विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. त्याआधी भारताने शुक्रवारी हैदराबाद टी20 सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला होता. आता या मालिकेचा निर्णायक सामना 11 डिसेंबरला मुंबईत खेळला जाईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---