चेन्नईच्या एमए चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. भारताने उभारलेल्या ३२९ धावांच्या प्रत्युत्तरादाखल इंग्लंडची अत्यंत दयनीय अवस्था झाली. इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांवर उरकला. अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन आश्विनने भारतीय गोलंदाजांचे नेतृत्व करत, पाच बळी मिळवून एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली.
अश्विनने दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगला पछाडत भारतीय खेळपट्टीवर सर्वाधिक कसोटी बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो दुसऱ्या स्थानी आला आहे. त्याचवेळी, अश्विनने हरभजन सिंगबाबतची लहानपणाची एक आठवण सांगितली.
अश्विनने टाकले हरभजनला मागे
अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाच बळी आपल्या नावे केले. त्यावेळी अश्विनने भारतीय भूमीवर कसोटीमध्ये सर्वाधिक फलंदाजांना बाद करणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसरे स्थान मिळवले. अश्विनने भारतीय खेळपट्ट्यांवर आत्तापर्यंत २६८ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. त्याने इंग्लंडच्या डावात बेन स्टोक्सचा त्रिफळा उडवत भारतभूमीवर आपला २६६ वा बळी मिळवला. यापूर्वी, हरभजन सिंगने भारतातील मैदानांवर २६५ कसोटी बळी मिळवले होते. भारतीय मैदानावर सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे अव्वलस्थानी आहे. त्याच्या नावे ३५० बळींची नोंद आहे.
अश्विनने सांगितली लहानपणीची आठवण
हरभजनला मागे सोडलेल्या अश्विनने दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर हरभजनबद्दलची आपल्या लहानपणीची एक आठवण सांगितली. तो म्हणाला, “लहानपणी माझे मित्र माझी खूप मजा करत. कारण, त्यावेळी मी भज्जू पा (हरभजन सिंग) सारख्या गोलंदाजी शैलीने गोलंदाजी करायचो. तिथपासून आज भज्जू पाचा विक्रम तोडण्यापर्यंत हा प्रवास झाला आहे. २००१ च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील त्याच्या कामगिरीपासून प्रेरणा घेतली होती. मात्र, मी आनंदी आहे. माफ कर भज्जू पा.”
A touch of class from Ash! 👏👏
He may have surpassed @harbhajan_singh to become the second-highest wickettaker in India in Tests but @ashwinravi99 has nothing but respect for the 'Turbanator'. 👍👏 @Paytm #TeamIndia #INDvENG
Here's what Ashwin said 🎥👇 pic.twitter.com/HIRSq07jCD
— BCCI (@BCCI) February 14, 2021
अव्वल गोलंदाज बनला आहे अश्विन
सध्या ३४ वर्षाचा असलेला अश्विन २०१० सालापासून भारतीय संघात खेळत आहे. अश्विनने आत्तापर्यंत ७६ कसोटी सामने खेळताना २५.३९ च्या सरासरीने ३९१ बळी मिळवले आहेत. ज्यामध्ये २९ वेळा सामन्यात ५ तर, ७ वेळा दहा बळी घेण्याची किमया केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय क्रिकेटर्स सामन्यादरम्यान वापरत आहेत जीपीएस ट्रॅकर, ‘हे’ आहे कारण
आयपीएल लिलाव २०२१ : सचिनच्या अर्जुनवर हे तीन संघ लावणार बोली
इशांत शर्माच्या इनस्विंगरवर रॉरी बर्न्स ठरला अंपायर्स कॉलचा बळी, पाहा व्हिडिओ