---Advertisement---

तुझसम तूच महान! धोनीवर कितीही टीका होऊदेत, पण प्रत्येक खेळाडूला त्याच्यासारखच बनायचंय

On: मंगळवार, मे 24, 2022 9:16 PM
MS-Dhoni
---Advertisement---

आयपीएलमधील दुसरी सर्वात यशस्वी फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जला (सीएसके) या हंगामात विशेष प्रदर्शन करता आले नाही. सीएसकेने त्यांचे १४ पैकी फक्त ४ सामने जिंकले असून त्यांच्यावर प्लेऑफमधून बाहेर होणारा दुसरा संघ बनण्याची नामुष्कीही ओढावली. सीएसके संघाप्रमाणे त्यांचा कर्णधार एमएस धोनी याचेदेखील या हंगामातील प्रदर्शन सरासरी राहिले. असे असले तरीही, राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू आर अश्विन याने धोनीवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

राजस्थान संघाने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओत अश्विन (R Ashwin) धोनीचे (MS Dhoni) कौतुक करताना दिसत (R Ashwin Praised MS Dhoni) आहे. आपल्या फिनिशिंग शैलीमध्ये माहीर असलेल्या धोनीचे कौतुक करताना अश्विन म्हणाला की, “टी२० क्रिकेटमध्ये फलंदाजी फळीत खालच्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करणे, ही एक अशी गोष्ट आहे जी कोणालाही करावीशी वाटत नाही. परंतु मी धोनीला दीर्घकाळापासून असे करताना पाहिले आहे. त्याला पाहून मी नेहमी हाच विचार करायचो की, तो किती अद्भुत खेळाडू आहे.

पुढे बोलताना अश्विन म्हणाला की, “धोनीला बऱ्याचदा त्याच्या संथ खेळीमुळे टीकेचा सामना करावा लागतो. परंतु तो खेळाला खोली देण्याची आणि सामना फिनिश करण्याची त्याच्यातील क्षमता शानदार आहे. तो इतका चांगला खेळाडू आहे की, प्रत्येकाला त्याच्यासारखा बनायचे असते. पण मला वाटते की, कधीही कोणी दुसरा धोनी बनू शकणार नाही.”

दरम्यान धोनीने आयपीएल २०२२मध्ये १४ सामने खेळताना ३३.१४ च्या सरासरीने २३२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक अर्धशतक निघाले आहे.

अश्विनने आपल्या फलंदाजी क्रमाबद्दलही दिली प्रतिक्रिया
राजस्थान संघाने अश्विनला बढती देत मधल्या फळीत फलंदाजीची संधी दिली आहे. याबद्दल बोलताना अश्विन म्हणाला की, “अधिकतर संघांकडून मला फलंदाजीसाठी फार कमी संधी मिळाल्या आहेत. मी नेहमी सातव्या, आठव्या किंवा नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत असायचो. त्यामुळे मला पूर्ण हंगामात जवळपास ४० चेंडूच खेळायला मिळायचे. एक असा खेळाडू, ज्याला थोडीफार फलंदाजी येते त्याला इतकी कमी फलंदाजीची संधी मिळाल्याने याचा सामना करणे फार कठीण होते.”

अश्विनने या हंगामात १५ सामने खेळताना ३०.५०च्या सरासरीने १८३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक अर्धशतकही निघाले आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘पंतची तुलना धोनीसोबत करू नका, कारण…’, प्लेऑफमध्ये न पोहोचणाऱ्या दिल्लीच्या कर्णधाराला ‘दादा’चा पाठिंबा

सामना जिंकायचं जाऊद्या ‘या’ नकोशा विक्रमात धोनीला वरचढ ठरलाय सॅमसन, पाहा आकडेवारी

आयपीएल २०२२मध्येही आरसीबी खाणार गटांगळ्या? ‘या’ कारणामुळे चॅम्पियन बनणे होणार कठीण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---