Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संजूबाबत अश्विनची भविष्यवाणी ठरली खरी! भारताकडून पंतच्या आधी टी20 पदार्पण करूनसुद्धा दुर्लक्षित

संजूबाबत अश्विनची भविष्यवाणी ठरली खरी! भारताकडून पंतच्या आधी टी20 पदार्पण करूनसुद्धा दुर्लक्षित

November 20, 2022
in T20 World Cup, क्रिकेट
Sanju-Samson-Upset

Photo Courtesy : Twitter/BCCI


भारतीय पुरूष क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. यातील दुसरा टी20 सामना रविवारी (20 नोव्हेंबर) माउंट मौनगानुईच्या बे ओव्हलवर खेळला गेला. या सामन्यासाठी जेव्हा नाणेफेक झाली तेव्हा सगळ्यांचे लक्ष भारताकडून कोण खेळणार याकडे लागले होते आणि भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याची भविष्यवाणी खरी ठरली, कारण पुन्हा एकदा संजू सॅमसन याला अंतिम अकरामध्ये जागा मिळाली नाही.

न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली तेव्हा संजू सॅमसन (Sanju Samson) याला टी20 बरोबरच वनडे संघात जागा मिळाली. त्यातच संघात रिषभ पंत (Rishabh Pant) हा विकेटकीपर असल्याने सॅमसनला अंतिम अकरामध्ये जागा मिळण्याची शक्यता कमीच होती आणि झालेही तसेच, मात्र पंत सलामीला येत 13 चेंडूत 6 धावा करत बाद झाल्याने पुन्हा एकदा सोशल मीडियावर सॅमसनबाबत चर्चा सुरू झाली.

दुसऱ्या टी20 सामन्यासाठी अश्विन याने भारताची अंतिम अकरा निवडली. त्यामध्ये त्याने कर्णधार हार्दिक पंड्या याच्यासह इशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव यांना जागा दिली. त्याचबरोबर शुबमन गिल, दीपक हुडा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल यानांही अंतिम अकरामध्ये जागा दिली. त्यामध्ये त्याने विकेटकीपर म्हणून सॅमसनला वगळत पंतला निवडले.

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सॅमसनने 2015मध्ये भारताकडून पदार्पण केले. तेव्हापासून त्याला केवळ 16 सामनेच खेळला आले. ज्यामध्ये त्याने एक अर्धशतकासह 296 धावा केल्या. त्याने मागील आयपीएलच्या हंगामात उत्तम कामगिरी केली होती. यामुळे त्याची राष्ट्रीय संघात जागा कायम होईल अशी अपेक्षा चाहते करत होते, मात्र त्याला अधिक संधी मिळाल्या नाही. जेव्हा-केव्हा संघातील महत्वाच्या खेळाडूंना ब्रेक दिला जातो अथवा छोट्या देशाचा दौरा असतो तेव्हा त्याला संघात घेतले जाते.

दुसरीकडे पंतने 2017मध्ये भारताच्या टी20 संघात पदार्पण केले. तेव्हापासून त्याने आतापर्यंत 65 सामने खेळताना 3 अर्धशतकांच्या सहाय्याने 976 धावा केल्या. Ashwin’s prediction about Sanju Samson came true! Ignored even by making his T20 debut before Rishabh Pant from India

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मैदानात उतरताच भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम, ऑस्ट्रेलियाला टाकले मागे
पंतची गाडी पळेना! 6 धावा करून बाद होताच बनला ‘अशी’ खराब कामगिरी करणारा भारताचा अव्वल फलंदाज

 


Next Post
Suryakumar-Yadav-And-Hardik-Pandya

भारताचा 'सूर्य' पुन्हा तळपला! टीम इंडियाच्या 6 बाद 191 धावा, कीवी फलंदाज मारणार का मैदान?

Photo Courtesy: Amazon Prime/Light Shot

लक्ष कुठे होतं रे? विचित्र पद्धतीने हिट विकेट होताच त्या यादीत सामील झाला श्रेयस

Suryakumar Yadav Century

रोहितच्या 15 वर्षांच्या अनुभवावर सूर्याचे दोन वर्ष भारी! टी20मध्ये केली 'या' खास विक्रमाची बरोबरी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143