दुबई। 19 सप्टेंबरला एशिया कप 2018 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडला. या सामन्यात भारताने 8 विकेट्सने मोठा विजय मिळवला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक करत विजयात मोलाची कामगिरी बजावली.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी 163 धावांचे आव्हान ठवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे सालामीवीर फलंदाज शिखर धवन आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात केली.
रोहितने सुरवातीपासूनच आक्रमक खेळ केला होता. या दोघांनी मिळून सालामीला 86 धावांची भागीदारी रचली. पण ही जोडी शादाब खानने रोहितला त्रिफळाचीत करुत तोडली. रोहितने या सामन्यात 39 चेंडूत 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 3 षटकार ठोकले.
हे त्याचे त्याच्या वनडे कारकिर्दीतील सर्वाद जलद अर्धशतक आहे. तसेच त्याने पाकिस्तानविरुद्ध एशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाजही बनण्याचा पराक्रम केला आहे.
या सामन्यात तो बाद झाल्यानंतर काही वेळात धवननेही विकेट गमावली. त्याला फहिम अश्रफने बाद केले. त्याचा झेल बाबर आझमने घेतला. धवनने या सामन्यात 54 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारांसह 46 धावा केल्या.
त्यानंतर मात्र दिनेश कार्तिक(31) आणि अंबाती रायडूने(31) एकही विकेट न गमावली नाही. अखेर कार्तिकने चौकार ठोकत भारताला 29 षटकात 163 धावांचे आव्हान सहज पार करुन दिली.
तत्पूर्वी पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांची सुरुवात अडखळत झाली. त्यांनी सुरुवातीच्या पाच षटकातच फकार जामन(0) आणि इमाम उल हक(2) या फॉर्ममध्ये असणाऱ्या सलामीवीरांची विकेट गमावली होती. या दोघांनाही भुवनेश्वर कुमारने बाद केले.
पण त्यानंतर शोएब मलिक आणि अझम बाबरने 82 धावांची भागीदारी रचत पाकिस्तानचा डाव सावरला होता. पण 22 व्या षटकात आझमला कुलदीप यादवने बाद करत ही जोडी तोडली. आझमने या सामन्यात 62 चेंडूत 47 धावा केल्या. यात त्याने 6 चौकार मारले.
तर मलिकने 1 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने 67 चेंडूत 43 धावा केल्या. आझम बाद झाल्यानंतर लगेचच केदार जाधवने पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदला(6) बाद केले अहमदचा अफलातून झेल बदली क्षेत्ररक्षक मनिष पांडेने बाउंड्री लाइनवर घेतला.
त्यानंतर लगेचच मलिकही धावबाद झाला. यानंतर मात्र पाकिस्तानच्या फलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. पाकिस्तानकडून अन्य फलंदाजांपैकी शदाब खान(8), फहीम अश्रफ(21), हसन अली(1), आसिफ अली(9), मोहम्मद अमीर(18) यांनी धावा केल्या.
भारताकडून भुवनेश्वर कुमार(3/15), केदार जाधव(3/23), जसप्रीत बुमराह(2/23) आणि कुलदीप यादवने(1/37) विकेट्स घेत पाकिस्तानचा डाव 43.1 षटकात 162 धावांवर संपुष्टात आणला.
तसेच या डावात भारताला मात्र अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापत ग्रस्त झाल्यामुळे धक्का बसला आहे. त्याला उष्णतेचा त्रास झाल्याने पाठीचे दुखापत झाली आहे. त्यामुळे आता त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–Video: मनिष पांडेने घेतला अफलातून झेल, पाकिस्तानच्या कर्णधाराची घेतली विकेट
–एशिया कप २०१८: हार्दिक पंड्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर; टीम इंडियाला मोठा धक्का
–Video: टीम इंडियाने सामन्यानंतर हाँग काँगला दिली खास भेट