एशिया कप 2018 स्पर्धेतील सुपर फोर मध्ये कोणते संघ खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. ब गटातील शेवटचा सामना अफगाणिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात 20 सप्टेंबरला अबूधाबी येथे होणार असून त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 सप्टेंबरला बांग्लादेशाचा सामना भारताशी दुबईला होणार आहे.
गटातील शेवटचा सामना खेळण्यापूर्वीच बांगलादेशला ग्रुप बी मधील दुसरा संघ बनविण्यात आला आहे. अफगाणिस्तान विरुद्धचा सामना जर बांगलादेशने जिंकला तर ते ब गटात अग्रस्थानी येऊ शकतात. ज्यामुळे त्यांचा सामना अ गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी होऊ शकतो. पण बांगलादेशला त्यांचा शेवटचा सामना खेळण्याआधीच दोन नंबरचा संघ बनवण्यात आले आहे.
आपल्या संघाला दुय्यम दर्जाची वागणूक दिल्यामुळे बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मोर्तझाने नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद प्रमाणे मोर्तझाने देखील एशिया कपचे सामने, सामन्यांचे वेळापत्रक आणि त्याचे ठिकाण याविषयी असमाधानी असल्याचे सांगितले.
त्याच्या मते पहिला सामना संपल्यानंतर दुसरा सामना सुरू होण्यासाठी 24 तासांपेक्षा कमी वेळ मिळत असल्याने खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळत नाही. बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे तिन्ही संघ आपापले सुपर फोरचे सामने दोन शहरात खेळणार आहेत तर भारत सर्व सामने दुबई येथे खेळणार आहे. भारत आणि इतर संघांमध्ये हा दुजाभाव का?
सलग दोन सामन्यांदरम्यान संघाला दीड तासाचा प्रवास करावा लागणार असल्याने खेळाडूंवर प्रवामुळे शीण येतो. त्यासोबतच येथील हवामान आणि उष्णतेमुळे खेळाडूंना अनेक अडचणी येतात, आशियाई क्रिकेट परिषदेने हे कसे केले हे समजत नसल्याचे मोर्तझा म्हणाला.
असे असेल सुपर फोर सामन्यांचे वेळापत्रक –
21 सप्टेंबर भारत विरूध्द बांग्लादेश – सुपर फोर – सामना 1
स्थान: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
वेळः सायंकाळी 5 वाजल्यापासून
21 सप्टेंबर पाकिस्तान विरूध्द अफगाणिस्तान – सुपर फोर – सामना 2
स्थान: शेख जयेद स्टेडियम, अबू धाबी
वेळः सायंकाळी 5 वाजल्यापासून
23 सप्टेंबर भारत विरूध्द पाकिस्तान – सुपर फोर – सामना 3
स्थान: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
वेळः सायंकाळी 5 वाजल्यापासून
23 सप्टेंबर अफगाणिस्तान विरुध्द बांग्लादेश – सुपर फोर – सामना 4
स्थान: शेख जयेद स्टेडियम, अबू धाबी
वेळः सायंकाळी 5 वाजल्यापासून
25 सप्टेंबर भारत विरुद्ध अफगाणिस्तान – सुपर फोर – सामना 5
स्थान: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
वेळः सायंकाळी 5 वाजल्यापासून
26 सप्टेंबर पाकिस्तान विरूध्द बांगलादेश – सुपर फोर – सामना 6
स्थान: शेख जयेद स्टेडियम, अबू धाबी
वेळः सायंकाळी 5 वाजल्यापासून
अंतिम सामना 28 सप्टेंबरला दुबईत होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशिया कप २०१८: भारताचा पाकिस्तानवर ८ विकेट्सने मोठा विजय
–Video: मनिष पांडेने घेतला अफलातून झेल, पाकिस्तानच्या कर्णधाराची घेतली विकेट