28 सप्टेंबरला पार पडलेल्या एशिया कप 2018 च्या अंतिम सामन्याआधी काही चाहत्यांनी हे या सामन्याची तिकिटे विकली आहेत. यात पाकिस्तानच्या चाहत्यांची संख्या अधिक होती. एशिया कपचा अंतिम सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात पार पडला.
पण काही चाहत्यांना पाकिस्तान अंतिम सामन्यात दाखल होईल अशी आशा होती. पण 26 सप्टेंबरला अंतिम सामन्यात दाखल होण्यासाठी बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यात पार पडलेला निर्णायक सामना बांगलादेशने 37 धावांनी जिंकत पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आणले.
त्यामुळे अनेक पाकिस्तानच्या चाहत्यांनी अंतिम सामन्याची घेतलेली तिकिटे विकण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबतीत खलीज टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार भारत-बांगलादेश सामन्याच्या आधी अनेक लोक या सामन्याचे तिकिटे स्थानिक वेबसाइटच्या मदतीने विकत होते. यातील अनेक पाकिस्तानचे चाहते होते.
यातील काही लोकांनी 33 टक्के फायद्याने तिकिटे विकली आहेत. तर काहींनी आहे त्याच किमतीत ही तिकिटे विकली. तसेच अनेकांना एमर्जन्सी कामानिमित्ताने जायचे असल्याने त्यांनी ही तिकिटे विकली आहेत.
या सामन्याची प्रिमियम वेस्ट स्टँडची 550 दिरहमची (जवळपास 10 हजार रुपये) पाच तिकिटे घेतलेल्या एका पाकिस्तानच्या चाहत्याने सांगितले की तिकिटांना त्यांच्या मुळ किमतीत विकण्यापलिकडे आमच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही.
तसेच एका नाराज झालेल्या पाकिस्तानच्या चाहत्याने सांगितले, “जर आमचा संघ पात्र ठरला नाही तर भारत आणि बांगलादेश दरम्यान होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी एवढे पैसे खर्च करुन सामना बघण्यात काही अर्थ नाही.”
तसेच याआधी या एशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील तिकिटांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे चाहत्यांना अंतिम सामनाही या दोन संघात होईल अशी अपेक्षा होती.
या दोन संघात या स्पर्धेत दोन सामने झाले होते. दोन्ही सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवला होता. ़
याबद्दल पाकिस्तानचा चाहता असलेला अदिल म्हणाला, “जरी पाकिस्तानचा संघ दोन्ही सामने हरला असला तरी मी अंतिम सामना पहायला गेलो असतो. आम्हाला माहित आहे प्रत्येक दिवस हा वेगळा असतो.”
“जरी पाकिस्तान भारताविरुद्ध सहज पराभूत झाला असला तरी आम्ही संघाकडून पुनरागमनाची अपेक्षा करत होतो. मी हा सामना पाहण्यासाठी आधीच प्रिमियमची तिकिटे विकत घेतली होती.”
एशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशवर 3 विकेट्सने विजय मिळवत सातव्यांदा विजेतेपद मिळवले आहे.
महत्वाच्या बातम्या-
–टीम इंडियाच्या या ११ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही
–एशिया कपमध्ये पाकिस्तानी ‘चाचा’ झाला टीम इंडियाचा सुपर फॅन
-टॉप ३: यष्टीरक्षक एमएस धोनीने केले हे खास विश्वविक्रम