इंग्लड दौऱ्यात खोऱ्याने धावा ओढल्यांतर विराट कोहलीला एशिया कपमध्ये विश्रांती देण्यात आली. इंग्लड दौऱ्यात विराटला पाठीच्या दुखापतीचा थोडासा त्रास झाला होता. विराट हा त्याच्या उत्कृष्ट फलंदाजी तसेच त्याच्या फिटनेससाठी देखील प्रसिध्द आहे.
त्याच्या फिटनेसने त्याने अफगाणिस्तानच्या संघालाही प्रेरणा दिली आहे. अफगाणिस्तानचा संघ 20 सप्टेंबरला बांग्लादेशाविरूद्धचा सामना अबुधाबीत खेळला तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 सप्टेंबरला पाकिस्तानविरूद्धचा महत्वाचा सामना देखील खेळून चांगली कामगिरी केली होती.
‘व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून अफगाणिस्तानचे खेळाडू स्वत:ला पुढील सामन्यासाठी तयार ठेवत आहेत . त्याच्यासाठी फिटनेस महत्वाची आहे. फिटनेसच्या बाबतीत आम्ही विराट कोहलीला आपले प्रेरणास्थान मानत आहोत.
अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान हा त्या संघातील सर्वात फिट खेळाडू आहे. त्याला पाहून इतर खेळाडू देखील त्याच्या सारखाच प्रयत्न करत आहेत’ असे संघाचे व्यवस्थापक हम्कर यांनी सांगितले.
संघातील बहूतेक खेळाडूंनी योयो टेस्टमधील कमीत कमी गुणांची पातळी गाठली आहे. सर्व खेळाडू हे 17.3 च्या पुढे आहेत काही खेळाडूंना सुधारण्याची गरज असून विश्वचषक स्पर्धेपर्यंत त्यांच्यात प्रगती होईल.
साखळी सामन्यात श्रीलंका आणि बांग्लादेश संघांना पराभवाचा धक्का दिल्यानंतर अफगाणिस्तानचा संघ स्पर्धेतील डार्क हॉर्स म्हणून पुढे येत आहे. सुपर फोर त्यांच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला दमवल्यानंतर भारत आणि बांग्लादेशाच्या आव्हानाचा सामना अफगाणिस्तानचा संघ कसा करतो .हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
महत्वाच्या बातम्या-
-अजिंक्य रहाणेचा वनडेत तडाखा, टीम इंडियाची दारे पुन्हा ठोठावली
-एशिया कप २०१८: भारताचा बांगलादेशवर मोठा विजय; कर्णधार रोहित शर्माचे शानदार अर्धशतक
-Video: धोनीच्या हुशारीने मिळवून दिली टीम इंडियाला ही महत्त्वाची विकेट