एशिया कप स्पर्धेत सुपर फोरमधील भारत-अफगाणिस्तान यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात 252 धावा करत 253 धावांते लक्ष्य भारतीय संघापुढे ठेवले.
त्याला प्रत्युत्तर देताना भारताने आपले सर्व गडी गमावत 49.5 षटकात 252 धावा केल्या. या सामन्यात भारताने संघात 5 मोठे बदल केले होते. त्याचा परिणाम आकडेवारीवर झालाय.
-आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटच्या इतिहासातील 36 वा सामना बरोबरीत सुटला. भारताचा हा 8 बरोबरीत सुटलेला सामना होता. तर अफगाणिस्तानचा हा पहिलाच बरोबरीत सुटलेला सामना आहे.
-भारताने 19 डावानंतर आपल्या सलामीचा फलंदाज बदलला आहे. अंबाती रायडूला भारताकडून पहिल्यांदा सलामीला खेळण्याची संधी मिळाली. त्याने 49 चेंडूचा सामना करताना 57 धावा केल्या.
-4 जून 2017 नंतर आणि 39 डावानंतर भारताने शिखर धवन किंवा रोहित शर्मा यांच्या दोघांपैकी एकही जण नसताना डावाला सुरुवात केली.
-अंबाती रायडू आणि केएल राहुल यांनी शतकी भागीदारी केली. त्यांची ही भागीदारी भारताकडून आंतरराष्ट्रीय वन-डे सामन्यात पहिल्या विकेटसाठी 100 वी शतकी भागीदारी ठरली. सर्वात जास्त सलामीच्या शतकी भागिदाऱ्यांचा विक्रम सचिन तेंडूलकर आणि सौरव गांगुली (21 शतकी भागीदाऱ्या)यांच्या नावावर आहे.
-अंबाती रायडू आणि केएल राहुल यांनी अर्धशतकी खेळी केली. ते रायडूचे 39 व्या वन-डेतील 8 वे अर्धशतक तर केएल राहुलचे 13 व्या वन-डेतील 2 रे अर्धशतक झळकावले.
महत्त्वाच्या बातम्या-
–महाराष्ट्राचे राज्यस्तरीय कबड्डी पंच शिबीर २८सप्टेंबरपासून तीन दिवस पुण्यात
–Video- बाॅलिंग करेगा या बाॅलर चेंज करे, जेव्हा धोनीला राग येतो
–टीम इंडियाला नडलेल्या अफगाणिस्तान संघावर कौतूकाचा वर्षाव