---Advertisement---

टीम इंडियाला नडलेल्या अफगाणिस्तान संघावर कौतूकाचा वर्षाव

On: बुधवार, सप्टेंबर 26, 2018 2:53 PM
---Advertisement---

काल (25 सप्टेंबर) एशिया कप स्पर्धेतील  भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात रोमहर्षक सामना दुबईत झाला. अफगाणिस्तानच्या संघाने भारतीय संघाला बरोबरीत रोखण्यात यश मिळवले. अफगाणिस्तानविरूद्ध भारताने संघात तब्बल पाच बदल केले होते.

यात कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, जयप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि यजुयेंद्र चहल यांना विश्रांती देण्यात आली होती. त्यांच्या जागेवर केएल राहुल, खलील अहमद, दिपक चहर, मनिष पांडे आणि सिद्धार्थ कौल यांना संघात स्थान दिले.

भारताने जरी आपला दुय्यम संघ मैदानात उतरवला असला तरी अफगाणिस्ताने केलेल्या संघर्ष हा पाहण्यासारखा होता. भारतीय सलामीवीर लोकेश राहूल आणि अंबाती रायडू यांनी 110 धावांची  दमदार सलामी दिली. त्यावेळी भारत सामना सहज जिंकेल असे वाटले होते. त्यानंतर अफगाणिस्तानने केलेला संघर्ष कायम स्मरणात राहिल.

शेवटच्या षटकात भारताचा रविंद्र जडेजा हा फलंदाजी करत होता. तर अफगाणिस्तानचा सर्वात यशस्वी खेळाडू राशिद खान गोलंदाजी करीत होता. शेवटच्या दोन चेंडूवर भारताला एका धाव हवी होती. जडेजा मिडविकेटला स्कुपशॉट मारला आणि झेलबाद झाला. सामना बरोबरी अवस्थेत संपला.

त्यावर माजी खेळाडूंनी टि्वटरवर अफगाणिस्तान संघाचे अभिनंदन करत प्रशंसा केली आहे. त्यात समालोचक हर्षा भोगले, संजय मांजरेकर, माजी कर्णधार वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment