दुबई। भारत आणि अफगाणिस्तान संघात एशिया कप 2018 च्या स्पर्धेतील पार पडलेला सुपर फोरचा सामना बरोबरीत संपला.
या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 252 धावा केल्या आणि 253 धावांचे लक्ष्य भारतीय संघापुढे ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 50 षटकात सर्वबाद 252 च धावा करता आल्या.
या सामन्यात भारताकडून सलामीवीर फलंदाज केएल राहुलने अर्धशतक केले. पण त्यानंतर त्याला 60 धावांवर असताना राशीद खानने पायचीत बाद केले. पंचांनी त्याला बाद झाल्याचा निर्णय दिल्यानंतर राहुलने रिव्ह्यू घेतला. पण हा रिव्ह्यू वाया गेला.
रिव्ह्यूमध्ये हा चेंडू लाइनमध्ये असून स्टंपला लागत असल्याचे स्पष्ट दिसल्याने थर्ड अंपायरनेही राहुलला बाद दिले. मात्र सामन्यात एका डावात एकच रिव्ह्यू उपलब्ध असल्याने आणि राहुलने घेतलेला हा रिव्ह्यू वाया गेल्याने त्याचा फटका भारताला नंतर बसला.
कारण कर्णधार एमएस धोनी आणि दिनेश कार्तिक यांना पंचांनी चुकीचे बाद दिल्यानंतर भारताकडे एकही रिव्ह्यू बाकी नव्हता.
याबाबतीत सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राहुल म्हणाला, “जेव्हा तुमच्याकडे एकच रिव्ह्यू असतो तेव्हा खूप कठिण असते. नक्कीच मागे पाहताना मला वाटले की मी तो रिव्ह्यू घ्यायला नव्हता पाहिजे. पण त्य़ावेळी खेळपट्टीवर असताना मला वाटले की मी बाहेर होतो, त्यामुळे या संधीचा उपयोग केला पाहिजे.”
‘अनेकदा इथे बसुन तुम्ही घेतलेल्या रिव्ह्यूला पुन्हा तपासता. आम्ही यातून शिकलो आहोत. मी जो फटका मारला आणि रिव्ह्यू घेतला ते पाहून मला मागे जाऊन पाहिले पाहिजे जेणेकरुन पुन्हा असे झाले तर मला फलंदाजी करताना कोणती योग्य जागेवर उभे रहायचे हे कळेल.’
तसेच तो पुढे म्हणाला, “जेव्हा चेंडूची गती कमी होते आणि तो फिरकीला साथ द्यायला लागतो तेव्हा मधल्या फळीतील फलंदाजासाठी धावा करणे अवघड होते. मला वाटते दिनेश कार्तिक चांगला खेळला आणि शेवटी रविंद्र जडेजा आणि दिपक चहरनेही चांगला लढा दिला.”
'The team management has given me a clear idea and plan on what they're expecting me to do' – @klrahul11 pic.twitter.com/wV158ZhlgW
— BCCI (@BCCI) September 26, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
–भारत-अफगाणिस्तान सामना टाय झाल्यानंतर रडणाऱ्या चिमुकल्या चाहत्याला भुवनेश्वर कुमारला दिली खास भेट
–टॉप ५: भारत-अफगाणिस्तानच्या सामन्यात झाले हे खास विक्रम
–महाराष्ट्राचे राज्यस्तरीय कबड्डी पंच शिबीर २८सप्टेंबरपासून तीन दिवस पुण्यात