भारत आणि बांग्लादेश यांच्यात एशिय कप स्पर्धेतील सुपर फोर फेरीतील पहिला सामना दुबईत झाला. या सामन्यात भारतीय फलंदाज शिखर धवनने एकाच डावात चार झेल घेत एकाच डावात चार झेल घेणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
भारताचा महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि माजी भारतीय कर्णधार द वॉल या नावाने प्रसिध्द असलेला राहुल द्रविड यांचा देखील यात समावेश आहे.
भारताने एशिया कप स्पर्धेची सूुरुवात हॉंगकॉंग विरूध्दच्या सामन्यात अडखळत केली होती. त्यानंतर भारताने पाकिस्तान आणि बांग्लादेशाविरूद्ध सफाईदार विजय मिळवत स्पर्धेतील आपली दावेदारी भक्कम केली आहे.
भारतीय गोलंदाजांनी यात महत्वाचे योगदान दिले आहे. भारतीय गोलंदाजी पुर्ण लयीत आहे. क्षेत्ररक्षण देखील अव्वल दर्जाचे होत आहे. त्यामुळे गोलंदाजीची धार वाढली आहे.
शिखरने फलंदाजी बरोबर क्षेत्ररक्षणात देखील उत्कृष्ट कामगिरी करत बांग्लादेशाविरूद्धच्या सामन्यात चार झेल घेतले. त्यात बांग्लादेशाचा सलामीचा फलंदाच नाझमुल हुसेन शांतो, अष्टपैलू शाकिब अल हसन, फिरकी गोलंदाज मेहंदी हसन आणि वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान यांचे झेल घेत महत्वाचे योगदान दिले. अशी कामगिरी करणारा शिखर 7 भारतीय खेळाडू ठरला आहे.
एकाच डावात चार झेल घेणारे भारतीय खेळाडू –
सुनिल गावसकर – 1985 विरूध्द- पाकिस्तान (शारजाह)
मोहम्मद अझरूद्दिन -1997 विरूध्द- पाकिस्तान (टोरोंंटो)
सचिन तेंडूलकर -1998 विरूध्द- पाकिस्तान (ढाका)
राहुल द्रविड-1999 विरूध्द- वेस्ट इंडिज (टोरोंटो)
मोहम्मद कैफ- 2003 विरूध्द- श्रीलंका (जोहान्सबर्ग)
व्ही व्ही एस लक्ष्मण- 2004 विरूध्द- झिंम्बॉब्वे (पर्थ)
महत्त्वाच्या बातम्या-
–अजिंक्य रहाणेचा वनडेत तडाखा, टीम इंडियाची दारे पुन्हा ठोठावली
–एशिया कप २०१८: भारताचा बांगलादेशवर मोठा विजय; कर्णधार रोहित शर्माचे शानदार अर्धशतक
–Video: धोनीच्या हुशारीने मिळवून दिली टीम इंडियाला ही महत्त्वाची विकेट