बांगलादेश येथे महिला आशिया चषक 2022च्या स्पर्धेत शुक्रवारी (7 ऑक्टोबर) भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. सामन्यात भारताने त्यांचा उत्तम खेळ सुरूच ठेवला आहे. यामध्ये पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या चांगलाच महागात पडल्याचे दिसत आहे. या सामन्यातील पहिल्या 6 षटकांचा खेळ भारताच्या नावावर राहिला आहे.
पाकिस्तानने धावफलकावर 33 धावा जोडताना तीन विकेट्स गमावल्या. पाकिस्तानला पहिला धक्का पूजा वस्त्राकरने दिला. तिने सिदरा अमीन (11 धावा) हिला विकेटकीपर रिचा घोषकरवी झेलबाद केले. त्याच्या पुढच्याच षटकात दीप्ति शर्मा हिने पाकिस्तानच्या दोन फलंदाजांंना लागोपाठ बाद केले. तिने विकेटकीपर-सलामीवीर मुनीबा अली (17) आणि ओमैमा सोहेल (0) यांच्या विकेट्स घेतल्या. यामुळे पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानचा रनरेट 6 जरी असला तरी त्यांनी 3 विकेट्स गमावल्या.
सध्या पाकिस्तानची धावसंख्या 10 षटकात 3 विकेट्स गमावत 61 आहे. कर्णधार बिस्माह महारूफ ही 17 धावा आणि निदा दार ही 31 धावा करत खेळपट्टीवर उपस्थित आहेत.
भारताकडे पाकिस्तावर डबल हॅट्ट्रीक करण्याची संधी आहे. कारण मागील पाकिस्तानविरुद्धच्या पाचही सामन्यात भारतच विजेता ठरला आहे. तसेच भारताने हा सामना जिंकला तर संघ आशिया चषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणार आहे, मात्र पाकिस्तान पराभूत झाला तर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
सहा वेळा आशिया चषकाचा विजेता भारत मागील काही सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी करत आहे. यामुळे या सामन्यात भारताचेच वर्चस्व असण्याची शक्यता आहे. तसेच टी20मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानची आकडेवारी पाहिली तर भारतच मजबूत स्थितीत दिसला आहे. या स्पर्धेत भारताने खेळलेले तिन्ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे पाकिस्तानला मागच्या सामन्यात थायलंडने पराभूत करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्याच्याकडे युवीसारखे षटकार मारण्याची क्षमता’; संजूचा जबरा फॅन झाला आफ्रिकन दिग्गज
हृदय जिंकलंस भावा! ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी रोहितने महिला चाहतीचा दिवस केला खास, व्हिडिओ पाहाच