भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज अमित मिश्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो नेहमीच क्रिकेटजगताशी संबंधीत गोष्टींवर व्यक्त होत असतो. तसेच आयुष्यातील इतर गोष्टींविषयी देखील मिश्रा सोशल मीडियावर त्याचे मत व्यक्त करताना दिसत असतो. आता मिश्रा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चर्चेचे कारण ठरत आहे एक पाकिस्तानी अभिनेत्री, जिला मिश्राने सोशल मीडियावर चोख प्रत्युत्तर दिले आहे.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान (AFG vs PAK) यांच्यात बुधवारी म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यापूर्वी अमित मिश्रा (Amit Mishra) याने ट्वीट केले होते की, ‘अफगानिस्तानने जर या सामन्यात पाकिस्तानला हरवले, तर मी पूर्ण आठवडा अफगाणी चाप खाईल.’ असे असले तरी, पाकिस्तान संघ मात्र या सामन्यात पराभूत झाला नाही. पाकिस्तानच्या नसीम शाहने शेवटच्या षटकात अफगाणिस्तानला दोन गगनचुंबी षटकार मारले आणि अफगाणिस्तानला 1 विकेट राखून पराभूत केले.
Will eat Afghani chaap whole week if Afganistan defeats Pakistan today. Fingers crossed. #AFGvsPAK
— Amit Mishra (@MishiAmit) September 7, 2022
अफगाणिस्तानविरुद्धचा हा सामना अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या दृष्टीने पाकिस्तानसाठी महत्वाचा होता. महत्वाच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी (Sehar Shinwari) हिने एक ट्वीट करून अमित मिश्रावर निशाणा साधला. ट्वीटमध्ये सेहरने लिहिले की, “बिचाऱ्या मिश्राला आता पूर्ण आठवडा गाईच्या शेनावर घालवावा लागेल.”
asia cup 2022 amit-mishra reply to-sehar-shinwari-troll
Will eat Afghani chaap whole week if Afganistan defeats Pakistan today. Fingers crossed. #AFGvsPAK
— Amit Mishra (@MishiAmit) September 7, 2022
अभिनेत्रीने खालच्या पातळीला जाऊन टाका केल्यानंतर मिश्राने देखील तिला चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्याने ट्वीटर या अभिनेत्री असे उत्तर दिले, ज्यामुळे त्याचे तोंड बंद झाल्याचे दिसत आहे. माजी फिरकीपटूने ट्वीटमध्ये लिहिले की, “नाही, माझा पाकिस्तानला येण्याचा कोणताही विचार नाहीये.” त्याने प्रत्युत्तार केलेले हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच अनेक भारतीय चाहत्यांना या अभिनेत्रीचे ट्वीट पाहिल्यानंतर ते चांगलेच संतावले आहेत. सेहर सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्याचेही दिसत आहे.
No, I have no plans of coming to Pakistan. 👍 https://t.co/HbFWeZSjij
— Amit Mishra (@MishiAmit) September 8, 2022
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कोहलीच्या सलामीच्या स्थानावरून भडकला राहुल; म्हणतोय, ‘तर मी काय संघाबाहेर जाऊ?’
‘अंतिम सामना खेळायचा होता पण…’, आशिया चषकातून बाहेर झाल्यानंतर केएल राहुलने व्यक्त केली खंत
आगामी टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा ‘मेंटर’ म्हणून ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची नियुक्ती