भारतीय संघाचा झिम्बाब्वे दौरा (ZIMvsIND) यशस्वीरित्या पार पडला आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत झिम्बाब्वेला क्लीन स्वीप दिल्यानंतर भारत आता एशिया कप (Asia Cup) स्पर्धेसाठी सज्ज आहे. परंतु, या प्रमुख स्पर्धेआधीच भारताला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या रूपात मोठा झटका मिळाला आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली आहे. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोठा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयने राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्याजागी वीवीएस लक्ष्मण (VVS Laxman)यांची एशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली आहे. एशिया कप २७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा युनायटेड अरब अमिराती (युएई) येथे खेळली जाणार आहे.
लक्ष्मण यांनी झिम्बाब्वे दौऱ्यात खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. आता ते द्रविड यांच्या अनुपस्थितीत एशिया कपमध्ये पुन्हा एकदा भारताच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भुमिकेत दिसणार आहेत. तर द्रविड यांची मंगळवारी (२३ ऑगस्ट) कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आल्याने त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवले आहे.
NEWS – VVS Laxman named interim Head Coach for Asia Cup 2022.
More details here 👇👇https://t.co/K4TMnLnbch #AsiaCup #TeamIndia
— BCCI (@BCCI) August 24, 2022
द्रविड यांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्यांना मंजुरी दिल्यावर ते पुन्हा संघात सामील होतील. तसेच लक्ष्मण हे दुबईमध्ये संघातील उपकर्णधार केएल राहुल, दीपक हुडा आणि आवेश खान यांच्यासोबत हरारे येथून रवाना झाले.
एशिया कपमधील भारताचा पहिला २८ ऑगस्टला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान (INDvsPAK) विरुद्ध आहे. तर भारत-पाकिस्तान संघ मागील वर्षी झालेल्या टी२० विश्वचषकानंतर समोरा-समोर येणार आहेत. विशेष म्हणजे दोन्ही संघ पुन्हा एकदा दुबईमध्येच एकमेंकाविरोधात खेळणार आहेत. भारतीय संघ एशिया कपमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. ज्याने भारताच्या विजेत्या २०१८ एशिया कप संघाचे नेतृत्व केले.
एशिया कपसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, आवेश खान.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात दिसणार नवा संघ
अखेर विराट बोललाच! खराब फॉर्मच्या प्रश्नावर तोडले मौन; म्हणाला…
आता चीनलाही खेळायचय ‘जबरा’ क्रिकेट! भारताकडेच मागितली ‘या’ गोष्टीची मदत