भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याचे आशिया चषकाच्या (Asia Cup) 15व्या हंगामामध्ये वेगळेच रुप पाहायला मिळाले आहे. मागील काही महिन्यांपासून आऊट ऑफ फॉर्म असणाऱ्या विराटने गुरूवारी (8 सप्टेंबर) शतकी खेळी करत टीकाकरांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्याने शतक करताच टीका करणाऱ्यांपैकी काहींनी आपले सूर बदलले आहेत. त्यामध्ये भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर याचा समावेश आहे.
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने विराट कोहली (Virat Kohli) जेव्हा लयीत नव्हता तेव्हा त्याच्या फलंदाजी क्रमवारीवर प्रश्न निर्माण केले होते. विराटने अफगाणिस्तान विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 71वे शतक करताच गंभीरचे शब्द बदलताना दिसले आहे. तो क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर समालोचन करतो.
आशिया चषकात गंभीर समालोचन करताना दिसला. तर भारत विरुद्ध हाँगकाँग सामना सुरू असताना सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने नाबाद 68 धावा केल्या होत्या, तेव्हा सूर्यकुमारने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी असे मत गंभीरने व्यक्त केले होते. तर आता विराटने शतक करताच गंंभीर त्याच्याच वक्तव्याशी मुकला आहे.
गंंभीर म्हणाला, “मी सूर्यकुमार यादवचा फॉर्म पाहून त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी असे म्हटले होते. मात्र आता विराटची खेळी पाहिली आणि तो ज्याप्रकारे खेळला त्यावरून कोहलीने तिसऱ्या आणि सूर्यकुमारने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी.”
There it is! 💯 for @imVkohli 👏👏
His first in T20Is and 71st in International Cricket.
Live – https://t.co/1UkuWxy3Ee #INDvAFG #AsiaCup2022 pic.twitter.com/2Yeakk1oLc
— BCCI (@BCCI) September 8, 2022
“हे पाहा, त्याला 3 वर्ष झाली आहेत, 3 महिने नाही याची जाणीव करून द्यायला हवी. मी त्याच्यावर टिका करत नाही. त्याने आधी चांगली कमगिरी करत खूप धावा काढल्या आहेत,” असेही गंभीरने पुढे म्हटले आहे.
विराटने मोठ्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय शतक केले आहे. त्याने आशिया चषकात अफगाणिस्तान विरुद्ध टी20 प्रकारातील पहिले शतक केले. यावेळी फलंदाजी करताना त्याच्यामध्ये जुन्या विराटची झलक दिसली. त्याने या सामन्यात चौफेर फटकेबाजी करत 200च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. त्याने 1019 दिवसानंतर हे शतक केले आहे, तर 56 चेंडूत त्याने षटकार मारत हे शतक पूर्ण केले. तर या सामन्यात त्याने 61 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 12 चौकार आणि 6 षटकार मारले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अमित मिश्राला ट्रोल करण्याचा प्रयत्न पाकिस्तानी अभिनेत्रीला पडला महागात, गोलंदाजांने दिलय चोख प्रत्युत्तर
कोहलीच्या सलामीच्या स्थानावरून भडकला राहुल; म्हणतोय, ‘तर मी काय संघाबाहेर जाऊ?’
टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूंची जागा धोक्यात! आशिया चषकातील कामगिरीचा फटका