---Advertisement---

Asia Cup: स्नेह राणाच्या फिरकीसमोर थायलंडचे वाजले बारा! अवघ्या 37 धावांत टीम ऑलआऊट

Sneh Rana
---Advertisement---

बांगलादेश येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषकात सोमवारी (10 ऑक्टोबर) भारत विरुद्ध थायलंड सामना खेळला जात आहे. सिल्हेट येथे सुरू असलेल्या या 19व्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारत स्म्रीती मंधाना हीच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. तिने घेतलेला निर्णय उत्तमच ठरला कारण थायलंड संघ 15.1 षटकातच 37 धावासंख्येवर सर्वबाद झाला. यामुळे भारताला जिंकण्यासाठी केवळ 38 धावा करण्याची आवश्यकता आहे.

भारत आधीच उंपात्य फेरीत पोहोचला असून त्यांच्यासाठी हा केवळ औपचारिक सामना आहे, तर थायलंडकडे उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी असून त्यांना हा सामना जिंकणे महत्वाचे आहे.

भारताच्या संघात रेणूका सिंग, हरमनप्रीत कौर, राधा यादव आणि दयालन हेमलता यांना विश्रांती देण्यात आली. यावेळी स्नेह राणा हीने तिच्या फिरकीने थायलंडला त्रस्त केले. तिला दीप्ति शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांची योग्य साथ लाभली. राणाने 4 षटके टाकताना 9 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

थायलंडच्या केवळ एकाच फलंदाजाला दुहेरी आकडी धावा करता आल्या, तर चार फलंदाज शून्य धावांवरच तंबूत परतले. सलामीवीर-विकेटकीपर नन्नापट कोंचाओएनकाय हीने 12 धावा केल्या. तिला दीप्तिने धावबाद केले. मेघना सिंग हीने 2.1 षटके टाकताना 6 धावा देत एक विकेट घेतली. तसेच दीप्तिने 4 षटकात 10 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. पूजा वस्त्राकर हीने 2 षटके टाकली. तिने त्यामध्ये 4 धावा दिल्या. राजेश्वरीने 3 षटकात 8 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

या स्पर्धेत भारताबरोबरच पाकिस्तान आणि श्रीलंका संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हे तिन्ही संघ गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. थायलंड आणि बांगलादेश यांना उपांत्य फेरीत जाण्याची संधी आहे. समजा, या सामन्यात थायलंड पराभूत झाला तर त्यांना मंगळवारी (11 ऑक्टोबर) खेळल्या जाणाऱ्या युनायटेड अरब अमिराती विरुद्ध बांगलादेश सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. या सामन्यात युएई जिंकला तरच त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
T20 World Cup: वॉर्म-अप सामन्यावेळी विराट कोहलीने केले असे काही, व्हिडिओ होतोयं तुफान व्हायरल
टीम इंडियाचा नाद करायचा नाय! आव्हानाचा पाठलाग करताना ‘इतक्यांदा’ मिळवलाय विजय, ऑस्ट्रेलिया- इंग्लंड लांबच
दक्षिण आफ्रिकेला पुरून उरलाय इशान, गांगुली अन् रोहितलाही न जमलेला पराक्रम पठ्ठ्यानं दाखवलाय करून

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---