भारतीय संघाने गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध सुपर फोरमधील शेवटचा सामना खेळला. दिग्गज विराट कोहली याच्या वादळी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने हा सामना 101 धावांनी जिंकला. विराटने अवघ्या 61 चेंडूत 200 च्या स्ट्राईकर 122 धावा केल्या. तब्बल 3 वर्षांनंतर विराटचे शतक पाहिल्यानंतर चाहत्यांची मने सुखापली आहेत. सामना सुरू असताना स्टेडियममध्ये अफगाणिस्तान आणि भारतीय संघातील चाहत्यांचा एक व्हिडिओ व्हायरल, ज्यामध्ये ते एकमांकाची गळाभेट घेताना दिसतात.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील या सामन्यापूर्वी बुधवारी (7 सप्टेंबर) अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक लढत पाहायला मिळाला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील या सामन्यादरम्यान, स्टेडियमध्ये खेळाडू आणि त्याचसोबत मैदानात उपस्थित चाहत्यांमध्ये वातावरण तापल्याचे दिसले. स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांमध्ये हातापयी झाल्याचे पाहायला मिळाले होते. तर आसिफ अली आणि फरीद अहमद याच्याकडून खेळपट्टीवरील वादामुळे 25 टक्के मॅच फिसचा दंड आकारण्यात आला. असे असले तरी, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात मात्र चित्र पूर्णपणे वेगळे दिसले.
अफगाणिस्तान संघाने या सामन्यात भारताकडून मोठा पराभव स्वीकारला, परंतु त्यांच्या चाहत्यांना सर्वांचीच मने जिंकली. भारत आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी एकत्र मिळून सामन्याचा आनंद घेतला. चाहत्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. व्हिडिओत पाहिले जाऊ शकते की, दोन्ही संघांचे चाहते भारत आणि अफगाणिस्तानचे नारे लावत आहेत. एवढेच नाही, दोघेही एकमेकांची गळाभेट देखील घेत आहेत. चाहत्यांकडून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
Spirit of brotherhood. Afghan and Indian fans during #AFGvsIND cricket match. 🇦🇫🇮🇳 pic.twitter.com/UweUaAwUwi
— Habib Khan (@HabibKhanT) September 9, 2022
दरम्यान, भारत आणि अफगाणिस्तान संघासाठी आशिया चषकाचा चालू हंगाम सारखाच ठरला आहे. सुरुवातीला हे दोन्ही संघ आशिया चषकाचे विजेतेपद पटकावण्यासाठी प्रमुख दावेदार मानले जात होते. परंतु सुपर फोरमधील त्यांचे प्रदर्शन अपेक्षित राहुले नाही. भारताने सुपर फोरमधील तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात पराबव स्वीकारला, तर अफगाणिस्तान तिन्ही सामन्यात पराभूत झाला. आता अंतिम सामना पाकिस्तान आणि श्रीलंका संघा 11 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘सब कंट्रोल में है?’, पहिल्यांदाच गोलंदाजी करणाऱ्या कार्तिकची पंतने घेतली मजा
विराटने शतक करताच गौतम गंभीरचा यू-टर्न! म्हणाला, ‘तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमारने…’
‘किंग’ कोहलीचं कौतुक करण्यापासून स्वत:ला थांबवू शकले नाहीत आजोबा, खाली झुकून केला मुजरा