श्रीलंकेविरुद्धच्या करो या मरो सामन्यात भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु विराटने चाहत्यांची चांगलीच निराशा केली. तो या महत्वाच्या सामन्यात एकही धाव करू शकला नाही. नाणेफेक गमाल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली. डावातील तिसऱ्या षटकात तो क्लीन बोल्ड झाला.
Thora ghabra len hum?#INDvsSL pic.twitter.com/9QPvyNzhsn
— 🍉 (@MedandCric) September 6, 2022
श्रीलंकन संघाचा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंका (Dilshan Madushanka) याने विराटाला शून्यावर बाद केले. भारताच्या डावीतल तिसऱ्या षटकात दिलशान मधुशंका गोलंदाजीसाठी आला होता. या षटाकातील चौथ्या चेंडू त्याने इन स्वींग टाकला, जो थेट स्टंप्समध्ये गेला. विराट एकही धाव न करता तंबूत परतल्यामुळे चाहते चांगलेच निराश झाले आहेत.
तत्पूर्वी आशिया चषकातील सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये विराटने चमकदार कामगिरी केली होती. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 35, त्यानंतर हाँगकाँगविरुद्ध नाबाद 59*, तर पाकिस्तानविरुद्ध सुपर फोरमध्ये 60 धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. सलग दोन अर्धशतकांनंतर चाहते त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा लावून बसले होते. परंतु तो या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही.
बातमी अपडेच होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
धोनीबद्दलच्या वक्तव्यानंतर आता विराटची इंस्टा स्टोरी चर्चेत! पाहा काय लिहिले
रोहितचं नशीब गंडलंय! श्रीलंकेने नाणेफेक जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग 11
जेमिमा रॉड्रिग्ज बिग बॅश लीग खेळणार! ‘या’ संघासोबत केला करार