आशिया चषक 2022 मध्ये मंगळवारी म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी रात्री भारत आणि श्रीलंका यांच्यातील करो या मरो सामन्याची सुरुवात झाली आहे. सुपर फोरमधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताला 5 विकेट्सने राखून पराभूत केले होते. आता अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या दृष्टीने भारताला पुढचे दोन्ही सामने जिंकवे लागतील. मंगळवारचा हा महत्वाचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
https://twitter.com/BCCI/status/1567143606078836736?s=20&t=2kVY3fKu3hn5KUeK92JVSA
भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन मागच्या काळापासून संघातून बाहेर होता. अखेर श्रीलंकेविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडले गेले आहे. युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई याच्या संघातून वगळल्यामुळे अश्विनला संघात निवडले गेले आहे.
प्लेइंग इलेव्हन –
One change in the #TeamIndia Playing XI.
R Ashwin comes in for Ravi Bishnoi.
Live – https://t.co/JFtIjXSBXC #INDvSL #AsiaCup2022 pic.twitter.com/yxZoLWYHTe
— BCCI (@BCCI) September 6, 2022
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल, विराट कोहली, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन.
https://twitter.com/OfficialSLC/status/1567144717355462659?s=20&t=Eb4jNdO_2TaU0ZqY6L73ew
श्रीलंका – पाथुम निसांका, कुसल मेंडिस(यष्टीरक्षक), चरित असलंका, दानुष्का गुनाथिलका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका(कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
AUSvsNZ: मॅक्सवेलच्या जबरदस्त झेलने गप्टिलला दाखवला तंबूचा रस्ता, पाहा व्हिडिओ
चहलसाठी आता आर-पारची लढाई! फेल ठरला तर थेट संघातून बाहेर
हार्दिकची धुलाई झाल्यावर माजी दिग्गजाला आठवला रविंद्र जडेजा, म्हणाला…




