---Advertisement---

सामना संपण्यापूर्वीच भारतीय संघाला कर्णधार रोहितच्या चुकिची शिक्षा, पुढील सामन्यात घ्यावी लागेल काळजी

On: सोमवार, ऑगस्ट 29, 2022 1:17 PM
Team India
---Advertisement---

एशिया कप (Asia Cup)या स्पर्धेचा 15वा हंगाम युनायटेड अरब अमिराती येथे खेळला जात आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना रविवारी ( 28 ऑगस्ट) भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) यांच्यात दुबई येथे खेळला गेला. हा सामना भारताने 5 विकेट्सने जिंकला आहे. मात्र या सामन्यात भारताचा रोहित शर्माने केलेली चूक संघाला चांगलीच महागात पडली आहे. तर पाकिस्तान विरुद्धचा सामना संपण्यापूर्वीच भारताला त्याची शिक्षाही मिळाली आहे.

या सामन्यात भारताचा कर्णधार-सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी भारताच्या गोलंदाजांनी सर्वोत्तम कामगिरी केली. त्यांनी सुरूवातीपासूनच पाकिस्तान संघाला धक्के दिले. एकीकडे सामना भारताच्या बाजूने असताना संघाला चालू सामन्यातच शिक्षेला सामोरे जावे लागले आहे.

पाकिस्तान फलंदाजी करत असताना शेवटच्या 3 षटकांमध्ये जेव्हा 30 यार्डमध्ये पाच खेळाडू दिसले तेव्हा आश्चर्य वाटले. मात्र तेव्हा समजून चुकले की भारतीय संघ नियमित वेळेनुसार 3 षटके मागे होता. त्यामुळेच अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवेळी एक खेळाडू त्या 30 यार्डच्या वर्तुळामध्ये होता.

स्लो-ओवर रेट आयसीसीचा नियम काय सांगतो
आयसीसीने आतापर्यंत सामन्याच्याशेवटी षटकांची गती कमी राखल्याने संघावर त्या सामन्यांतील काही शुल्काचा दंड आकारला आहे. मात्र आता नव्या नियमानुसार, गोलंदाजी करणारा संघ निर्धारित वेळेत कमी षटके टाकत मागे राहिला असेल, तर त्या संघाला 30 यार्ड वर्तुळात आणखी एका खेळाडूला ठेवणे बंधनकारक आहे. भारतालाही शेवटच्या षटकात याची शिक्षा मिळाली आहे. त्यामुळेच त्यांना एका खेळाडूला आतमध्ये ठेवावे लागले.

सामन्यातील भारताची कामगिरी
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने 4 षटकांत 26 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला 10 धावांवर बाद करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. त्याचबरोबर हार्दिक पांड्या यानेही 4 षटकातं 25 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. भारतान पाकिस्तानला 19.5 षटकात 147 धावात सर्वबाद केले.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून विराट कोहली याने 35 धावा केल्या. त्याच्यानंतर रविंद्र जडेजा आणि पांड्या यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला सामना जिंकून दिला. जडेजाने 33 आणि पांड्याने नाबाद 35 धावा केल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भर सामन्यात पाकिस्तानची जर्सी घालून आला विराटचा जबरा फॅन! आता सोशल मीडियावर घालतोय राडा
असे काय झाले की, हार्दिकने लाईव्ह सामन्यात पकडला रिझवानचा गळा! INDvsPAK मॅचमधील व्हिडिओ व्हायरल
‘बाप देशभक्तीचं उदाहरण देत असताना, पोराकडून तिरंग्याचा तिरस्कार!’ बीसीसीआय सचिव जय शहा ट्रोल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---