झिम्बाब्वेच्या दौऱ्यानंतर आता भारतीय संघ एशिया कप (Asia Cup) स्पर्धेत खेळणार आहे. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचे सामने युनायटेड अरब अमिराती (युएई) येथे खेळले जाणार आहेत. यामधील भारताचा पहिला सामना २८ ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध दुबई येथे होणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ २०२१च्या टी२० विश्वचषकानंतर आमनेसामने येणार आहेत. तर या संघांचा एक इतिहास राहिला आहे. याबाबत अनेक बाबी आणि मजेशीर किस्सेही ऐकायला मिळतात.
त्यातील एक नावाजलेला किस्सा तो म्हणजे भारत-पाकिस्तान संघातील एकाच नावाचे खेळाडू अनेकवेळा एकमेंकाविरुद्ध खेळले आहेत. एक नाव आहे. ते खेळाडू एकाचवेळी दोन्ही संघात खेळत होते. असे एकाच सामन्यांत नाही तर अनेक सामन्यांत ते समोरासमोर खेळले आहेत. ते नाव आहे सईद किरमानी.
सईद किरमानी भारत आणि पाकिस्तान या दोन्हीकडून खेळत होते. असे २८वेळा घडले आहे. ९ वेळा वनडे सामन्यांत तर १९ वेळा कसोटी सामन्यांत.
भारताचे सईद किरमानी हे यष्टीरक्षक-फलंदाज होते. त्यांना संघसहकारी किरी या नावाने बोलवत असत. तसेच ते १९८३च्या विश्वविजेच्या संघाचा भागही होते. त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अनेक पदांवर काम देखील केले आहे. त्यांचे पूर्ण नाव सईद मुजताबा हुसैन किरमानी (Syed Mujtaba Hussein Kirmani) आहे.
भारताच्या सईद किरमानीची ओळख तर झाली आता पाकिस्तानचा सईद किरमानी कोण होता. त्यांचे उत्तर आहे जहीर अब्बास. त्यांचे नाव पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिले आहे. त्यांचे पूर्ण नाव सईद जहीर अब्बास किरमानी (Syed Zaheer Abbas Kirmani). त्यांच्या नावावर एक विश्वविक्रमदेखील आहे. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतकांचे शतक केले आहे.
जेव्हा भारतीय संघ १९७८-७९मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता, तेव्हा भारतीय संघातील बिशनसिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना आणि भागवत चंद्रशेखर (भारताची फिरकीची तिकडी बेदी, प्रसन्ना, चंद्रा) ही भारताची त्यावेळेची फिरकीतील तगडी बाजू होती. मात्र जहीर अब्बास यांनी जावेद मियादांद सोबत भारताच्या या फिरकीपटूंचा चांगलाच समाचार घेतला. जहीर अब्बासने एका पाठोपाठ १७६, ९६ आणि २३५ धावा केल्या. ती कसोटी मालिका पाकिस्तानने २-० अशी जिंकली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
झिम्बाब्वेला क्लिन स्वीप करत भारताचा पाकिस्तानला ‘दे धक्का’, वनडे क्रमवारीत पोहोचला ‘या’ स्थानी
Photo: ‘या’ भारतीय क्रिकेटरची होणारी पत्नी आहे सौदर्यांची खाण, बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते मात
एशिया कप २०२२मध्ये आपल्या बॅटची जादू दाखवायला तयार आहे केएल राहुल