भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रंगतदार सामना रविवारी (28 ऑगस्ट) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्या यांनी जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन केले आणि रोहितचा हा निर्णय अगदी योग्य असल्याचे दाखवून दिले. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानचा संघ २० षटके पूर्ण खेळू शकला नाही. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली.
ही पहिली वेळ आहे, जेव्हा भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांनी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वच्या सर्व विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तानच्या सर्व फलंदाजांनी भारताच्या वेगवान गोलंदाजांपुढेच शरणागती पत्करली. यामध्ये भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याचे योगदान सर्वात महत्वाचे ठरले. भुवनेश्वरने या सामन्यात सर्वात जास्त ४ विकेट्स घेतल्या. त्याने स्वतःच्या चार षटकांच्या कोट्यामध्ये २६ धावा खर्च केरून ही कामगिरी केली.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) या सामन्यात भारतासाठी दुसरा सर्ाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. हार्दिकने ४ षटकात २५ धावा खर्च केल्या आणि ३ महत्वाच्या पाकिस्तानी खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) यानेही ३.६ षटकात ३३ धावा खर्च कलून २ विकेट्स घेतल्या. आवेश खान (Avesh Khan) याला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली. आवेशही त्याच्यावर दाखवलेल्या विश्वासास पात्र ठरला. त्याने दोन षटकात १९ धावा खर्च केल्या, पण एक महत्वाची विकेट देखील घेतली.
दरम्यान, भारतीय गोलंदाजांच्या या जबरदस्त प्रदर्शनामुळे पाकिस्तानचा संघ १९.५ षटकात १४७ धावा करून सर्वबाद झाला. त्यांचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam ) मोठी खेळी करेल, अशी अपेक्षा होती. परंतु त्याने अवघ्या १० धावा करून विकेट गमावली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अर्शदीप अन् भुवीच्या जोडीने भारताची स्थिती केली मजबूत! भारतीय वेगवान गोलंदाजांनी सामन्यावर राखलाय दबदबा
दुबईच्या मैदानावर पाऊल ठेवताच सचिनला मागे सोडत रोहित बनला ‘अव्वल नंबरी’
टेन्शनच्या वातावरणातही झमानने जिंकली साऱ्यांचीच मने; ‘ती’ कृती ठरते चर्चेचा विषय