आशिया चषक (Asia Cup) 2022च्या स्पर्धेतील पाचवा सामना श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुबई येथे खेळला गेला. शेवटच्या षटकापर्यंत गेलेल्या या रोमांचक सामन्यात श्रीलंकेने 2 विकेट्सने विजय मिळवला. या सामनाचा नायक कुसल मेंडिस ठरला. त्याने आपल्या ताबडतोब फलंदाजीने संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याच्या या महत्वपूर्ण योगदानाने श्रीलंका संघ सुपर फोरमध्ये पोहोचला आहे. यामुळे त्याला प्लेयर ऑफ दी मॅच म्हणून निवडले गेले. ही खेळी करण्यासाठी त्याने कसा कठोर सराव केला याचा खुलासा त्याने स्वत: केला आहे.
बांगलादेश विरुद्ध श्रीलंकेची गोलंदाजी ढिसाळ जरी झाली असली तरी फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामध्ये मुख्य भुमिका कुसल मेंडिस (Kusal Mendis) याने पार पाडली आहे. त्याने संघाला चांगली सुरूवात करून दिली. त्याने सलामीला येत 60 धावांची विशेष खेळी केली आहे. त्याने 37 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत.
मेंडिसने फलंदाजी करताना बाद होण्यापूर्वी संघाला 131 पर्यंत पोहोचवले. त्याला मुस्तफिजूर रहमान याने तस्कीन अहमदकरवी झेलबाद केले. त्याला सामनावीर म्हणून घोषित केले त्यानंतर त्याने म्हटले, “पहिले सहा षटके मी माझा सामन्य खेळ केला आणि नंतरच्या चार षटकात मोठे शॉट्स मारले. नो बॉलमुळे मी पुन्हा एकदा चांगली फलंदाजी केली.”
“मी 60 धावा करत संघासाठी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले. त्यासाठी मी मागील सहा महिन्यांपासून ते एक वर्षापर्यंत श्रीलंकेत अभ्यास केला आहे. मी रोजच काहीनाकाही नवीन शिकत आहे आणि मला माहित आहे संघाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे. समर्थन दर्शवण्यासाठी श्रीलंकेच्या चाहत्यांचे खूप खूप धन्यवाद, असेही मेंडिसने पुढे म्हटले आहे.
A 60 off 37 balls, Kusal Mendis awards him the Man of Match!#RoaringForGlory ##SLvBAN pic.twitter.com/re31QOKgjv
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 1, 2022
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकांत 7 विकेट्स गमावत 183 धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना मेंडिसने संघाला उत्तम सुरूवात करून दिली. तसेच त्याला श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका (Dasun Shanaka) याने योग्य साथ दिली. मेंडिस-शनाका जोडीने पाचव्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. यावेळी शनाकाने 33 चेंडूत 45 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 2 षटकार आणि 3 चौकार मारले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आम्हालाही काही सल्ले द्या’, करा वा मरा लढतीपूर्वी हाँगकाँगच्या कर्णधाराची आझमकडे मदतीसाठी धाव
एक पराभव पाकिस्तानला दाखवेल घरचा रस्ता, हाँगकाँगविरुद्ध ‘या’ 11 खेळाडूंसह उतरेल आझम
चोरीचा मामला.. बांगलादेशविरुद्ध श्रीलंकेची चिटिंग? ड्रेसिंग रूममध्ये पाठवण्यात आले सिक्रेट कोड