श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघात गुरुवारी (01 सप्टेंबर) आशिया चषक 2022 चा पाचवा साखळी फेरी सामना खेळला गेला. या अतिशय महत्त्वाच्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने 2 विकेट्स राखून विजय मिळवला आणि सुपर-4 फेरीत प्रवेश केला. या पराभवानंतर बांगलादेशच्या संघाला मात्र स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. यानंतर मात्र श्रीलंकेने सामन्यादरम्यान चिटिंग केली असल्याची चित्रे पुढे आली आहे.
श्रीलंकेचे प्रशिक्षक या ‘करा अथवा मरा’ सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममधून सिक्रेट कोड (Sending Secret Code) पाठवताना दिसले आहेत. त्यांची काही छायाचित्रे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
श्रीलंकेचा बांगलादेशवर थरारक विजय
श्रीलंकेने बांगलादेशवर (Sri lanka vs Bangladesh) 2 विकेट्सने विजय नोंदवला. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्सच्या नुकसानावर 183 धावा केल्या. बांगलादेशकडून सलामीवीर मेहिदी हसन आणि अफिफ हुसैन यांनी सर्वाधिक धावा केल्या. हुसैनने 30 तर हसनने 38 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांना 30 धावाही करता आल्या नाहीत. या डावात श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगा आणि चमिका करुणारत्ने यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघाने 19.2 षटकातच 4 चेंडू शिल्लक ठेवून बांगलादेशचे आव्हान पूर्ण केले. श्रीलंकेकडून सलामीवीर कुसल मेंडिस याने 37 चेंडूत 60 धावांची शानदार खेळी केली. तसेच दसुन शनाकाने कर्णधार खेळी केली. त्याने 45 धावा फटकावल्या आणि संघाच्या विजयात हातभार लावला.
श्रीलंकेच्या संघाची विजयासाठी चिटिंग
या सामन्यादरम्यान श्रीलंकेचे प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड (Chris Silverwood) आणि संघाचे ऍनालिस्ट ड्रेसिंग रूममधून सिक्रेट कोड पाठवताना दिसले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल फोटोंमध्ये दिसते की, सिल्वरवूड संघाच्या ऍनालिस्टसोबत मिळून ड्रेसिंग रूममधून मैदानातील खेळाडूंना सूचक इशारा करत आहेत. त्यांच्यापुढील टेबलवर ‘2डी’ असे लिहिलेल्या दोन पाट्या दिसत आहेत.
If signals are sent from the dressing room, then what is the role of a captain in the field ? Cricket is not football. @OfficialSLC https://t.co/HOC7PgleBq
— Md Sahid Mondal (@imdsahidmondal) September 1, 2022
विशेष म्हणजे, सिल्वरवूड यांनी असे सिक्रेट कोड पाठवण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांना यापूर्वीही 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेत इंग्लंडविरुद्ध पार पडलेल्या टी20 मालिकेतही असे करताना पाहिले गेले होते. यावेळी ते इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक होते आणि त्यांनी इंग्लंडचा तत्कालिन कर्णधार मॉर्गनला असे सिक्रेट कोड पाठवले होते. त्यावेळी त्यांच्यावर चिटिंग केल्याचा आरोप करण्यात आला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हिशोब बरोबर! 4 वर्षांपूर्वीचा सूड पूर्ण करत श्रीलंकेच्या खेळाडूंचा नागिन डान्स, सेलिब्रेशनची सर्वत्र चर्चा
अखेर श्रीलंकेचाच नागिण डान्स! थरारक सामन्यात बांगलादेशला नमवत सुपर फोरमध्ये धडक
वीरू-गौतीच्या खांद्यावर पुन्हा नेतृत्वाची धुरा! लिजेंड्स लीगमध्ये ‘या’ संघांचे बनले कर्णधार






