---Advertisement---

हिशोब बरोबर! 4 वर्षांपूर्वीचा सूड पूर्ण करत श्रीलंकेच्या खेळाडूंचा नागिन डान्स, सेलिब्रेशनची सर्वत्र चर्चा

On: शुक्रवार, सप्टेंबर 2, 2022 9:28 AM
Sri-lanka-Bangaldesh-Celebration
---Advertisement---

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघात गुरुवारी (01 सप्टेंबर) आशिया चषक 2022 मधील पाचवा सामना खेळला गेला. हा सामना दोन्ही संघांसाठी करा अथवा मरा सामना होता. दुबईच्या मैदानावर झालेला हा सामना श्रीलंकेने 2 विकेट्सने जिंकला आणि सुपर-4 फेरीत प्रवेश केला. तर पराभवासह बांगलादेशचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला आहे. या सामना विजयानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी केलेले सेलिब्रेशन चर्चेत आहे. 

बांगलादेशवरील (Bangaldesh vs Sri Lanka) विजयासह श्रीलंकेने मागील 4 वर्षांपूर्वीचा हिशोब बरोबर केला आहे. यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी बांगलादेशच्या संघाला त्यांच्यात शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. 

श्रीलंकेचा बांगलादेशवर थरारक विजय
श्रीलंकेने बांगलादेशवर 2 विकेट्सने विजय नोंदवला. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्सच्या नुकसानावर 183 धावा केल्या. बांगलादेशकडून सलामीवीर मेहिदी हसन आणि अफिफ हुसैन यांनी सर्वाधिक धावा केल्या. हुसैनने 30 तर हसनने 38 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांना 30 धावाही करता आल्या नाहीत. या डावात श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगा आणि चमिका करुणारत्ने यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघाने 19.2 षटकातच 4 चेंडू शिल्लक ठेवून बांगलादेशचे आव्हान पूर्ण केले. श्रीलंकेकडून सलामीवीर कुसल मेंडिस याने 37 चेंडूत 60 धावांची शानदार खेळी केली. तसेच दसुन शनाकाने कर्णधार खेळी केली. त्याने 45 धावा फटकावल्या आणि संघाच्या विजयात हातभार लावला.

https://twitter.com/Iam_SUMITRAJ/status/1565398081637855232?s=20&t=2AlfH7dnTiliOz9NS1z3cg

काय आहे श्रीलंका आणि बांगलादेशातील सेलिब्रेशनमागील ठसनचे कारण?
या विजयानंतर श्रीलंकेने बांगलादेशबरोबरचा 4 वर्षे जुना हिशोब बरोबर केला आहे. 2018च्या निदाहास ट्रॉफीतील उपांत्य सामन्यात श्रीलंका आणि बांगलादेश आमने सामने होते. या सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये खूप बाचाबाची सुरू होती. मैदानावरही खेळाडूंमध्ये आपापसांत वाद झाल्याचे दिसले होते. या चकमकीनंतर बांगलादेशने सामन्यात बाजी मारली आणि नागिन डान्स करत विजयाचा जल्लोष साजरा केला.

आता आशिया चषकातील महत्त्वपूर्ण सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशला पराभवाचा धक्का देत आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आणले आहे. या मोठ्या विजयानंतर श्रीलंकेचे खेळाडू मैदानावर नागिन डान्स करताना दिसले. चमिका करुणारत्नेने नागिन डान्स करत विजयाचा जल्लोष साजरा केला आहे. सोशल मीडियावर करुणारत्नेचा नागिन डान्स (Nagin Dance) जोरदार व्हायरल होत आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष: वेगवान गोलंदाज इशांत शर्माबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: लांब केसांमुळे अक्षरश: दंड भरायला तयार होणारा इशांत शर्मा
टी20 लिजेंड! ब्राव्होनंतर अशी ‘ऑलराऊंड’ कामगिरी करणारा केवळ दुसरा क्रिकेटपटू बनला शाकिब

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---