महिला आशिया चषकात (Asia Cup) भारतीय संघाचा दुसरा सामना सोमवारी (3 ऑक्टोबर) मलेशियाशी आहे. या सामन्यात मलेशियाने नाणेफेक जिंकंत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. त्यानुसार भारताने उत्तम सुरूवात केली. या सामन्यासाठी स्म्रीती मंधाना हिला विश्रांती दिली असून तिच्या अनुपस्थितीत सभिनेनी मेघना शेफाली वर्मा हिच्यासोबत सलामीला आली. यावेळी भारताने 20 षटकात 4 विकेट्स गमावत 181धावांचा डोंगर उभारला आहे.
सभिनेनी मेघना ( Sabbhineni Meghana) आणि शफाली वर्मा (Shafali Verma) यांनी पहिल्या पॉवरप्लेमध्ये 47 धावा करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. मेघनाने-शेफाली यांनी पहिल्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली. मेघनाने अर्धशतकी खेळी केली. तिने 53 चेंडूत 69 धावा केल्या. यामध्ये तिने 11 चौकार आणि एक षटकार खेचला. ती बाद झाल्यावर शेफालीने रिचा घोष हिच्यासोबत 42 धावांची भागीदारी केली. शेफाली 46 धावा करत बाद झाली. तिने एक चौकार आणि तीन षटकार खेचले, तर किरण नवगिरे ही गोल्डन डकवर बाद झाली.
A fine knock from S Meghana as she brings up her 5⃣0⃣ 👌👌
At the halfway mark of the innings, #TeamIndia are 77/0.
Follow the match 👉 https://t.co/P8ZyYRNetd#AsiaCup2022 | #INDvMAL
📸Courtesy: Asian Cricket Council pic.twitter.com/Lbu0NrHDBZ
— BCCI Women (@BCCIWomen) October 3, 2022
रिचा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आली होती. ती 19 चेंडूत 33 धावा करत नाबाद राहिली. तिने तिच्या छोट्या आणि महत्वपूर्ण खेळीत 5 चौकार आणि एक षटकार खेचला. राधा यादव हिने दोन चौकार ठोकत 8 धावा केल्या. तसेच दयालन हेमलताने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत एक चौकार आणि एक षटकार खेचला. यावरून भारताच्या फलंदाजांंनी चांगली कामगिरी करत मलेशियाच्या गोलंदाजांना त्रास दिला. आता भारताचे गोलंदाज कशी कामगिरी करतील याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
या सामन्यासाठी मंधानाबरोबर स्नेह राणा, पूजा वस्त्राकर आणि रेणुका सिंग ठाकुर यांनाही आराम दिला गेला आहे, तर मेघना आणि नवगिरे यांच्यासोबत राजेश्वरी गायकवाड आणि मेघना सिंग यांना अंतिम अकरामध्ये घेतले आहे.
या स्पर्धेत भारताने पहिला सामना जिंकत विजयी सुरूवात केली. त्यांनी श्रीलंकेला 41 धावांनी पराभूत केले. भारत सहा वेळा आशिया चषकाचा चॅम्पियन ठरला आहे, यामुळे पुन्हा एकदा चषकावर आपले नाव कोरण्याचा भारताचा प्रयत्न आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिक्षाचालकचा मुलगा काढणार दक्षिण आफ्रिकी संघाचा घाम! भारतीय संघात पहिल्यांदाच मिळालीये संधी
INDvSA: ‘सूर्याच खरा गेमचेंजर’, मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या राहुलचे आश्चर्यकारक विधान
टेन्शन वाढलं! हर्षल-अक्षर आणि अर्शदीपला मिळून चोपल्या गेल्या 160 धावा