बांगलादेश येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषक (Asia Cup) 2022च्या हंगामातील तेरावा सामना शुक्रवारी (7 ऑक्टोबर) भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvPAK) यांच्यात खेळला जाणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत तीन सामने जिंकला असून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तसेच त्यांनी पाकिस्तानला पराभूत केले तर ते उपांत्य फेरीत पोहोचतील. पाकिस्तानचा मागील सामन्यात थायलंडने पराभूत करत त्यांना चांगलाच धक्का दिला होता, त्यातून सावरत आणि स्पर्धेत आपले आव्हान कायम राखण्याच्या हेतूने ते मैदानात उतरणार आहेत.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या शफाली वर्मा आणि किरण नवगिरे या दोघींना अंतिम अकरातून वगळले आहे. तर स्नेह राणाच्या जागी राधा यादवची संघात एंट्री झाली आहे. पाकिस्ताननेही दोन बदल केले आहेत. कायनात इम्तियाज आणि डायना बेग यांच्याजागी आयमान अन्वर आणि सादिया इक्बाल यांची अंतिम अकरामध्ये निवड केली आहे.
भारताची युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स ही या स्पर्धेत चांगलीच फॉर्ममध्ये आहे. तिने 3 सामन्यात 151च्या सरासरीने 151 धावा केल्या आहेत. पाकिस्तानविरुद्धही तिच्याकडून अशाच खेळीची अपेक्षा असणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात मागील पाच सामन्यांमध्ये भारतच विजेता ठरला आहे. तसेच 2018च्या आशिया चषकातही भारतच जिंकला होता. त्याचबरोबर यावर्षीची भारत-पाकिस्तान महिला संघांची ही दुसरी भेट आहे. याआधी ते बर्मिंघम येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये समोरासमोर आले होते. तेव्हाही भारताचेच पारडे जड ठरले होते. तो सामना भारताने 8 विकेट्सने जिंकला होता.
दोन्ही संघाची प्लेईंग इलेवन
भारतीय महिला संघ: , स्म्रीती मंधाना, सभिनेनी मेघना, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दयालन हेमलता, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग, राधा यादव आणि राजेश्वरी गायकवाड.
Women's Asia Cup. India XI: S Meghana, S Mandhana, J Rodrigues, H Kaur (c), R Ghosh (wk), D Sharma, P Vastrakar, R Yadav, R Gayakwad, D Hemalatha, R Singh. https://t.co/Q9KRCvywBz #INDvPAK #AsiaCup2022
— BCCI Women (@BCCIWomen) October 7, 2022
पाकिस्तान महिला संघ: मुनीबा अली (विकेटकीपर), सिद्रा अमीन, बिस्माह मारूफ (कर्णधार), निदा दार, आयेशा नसीम, आलिया रियाझ, ओमामा सोहेल, आयमान अन्वर, तुबा हसन, सादिया इक्बाल आणि नशरा संधू.
This is how @TheRealPCB are lined up
Bismah Maroof (C)
Aiman Anwar
Aliya Riaz
Ayesha Naseem
Muneeba Ali (WK)
Nida Dar
Omaima Sohail
Sadia Iqbal
Sidra Amin
Tuba Hassan
Nashra Sandhu#INDvPAK #WomensAsiaCup2022 #ACC— AsianCricketCouncil (@ACCMedia1) October 7, 2022
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSA: काय सांगता, संजू सॅमसनने वनडेमध्ये सरासरीत विराट-धोनीला टाकले मागे
नाद करायचा नाय! मागच्या 5 वनडेत नुसती आग ओकतेय श्रेयस अय्यरची बॅट, आकडेवारी पाहाच