---Advertisement---

आशिया चषक जिंकणारा संघ होणार मालामाल, कोटींमध्ये मिळणार प्राइज मनी; उपविजेत्यांनाही…

On: शनिवार, सप्टेंबर 10, 2022 11:59 AM
---Advertisement---

ऑगस्ट 27, रोजी सुरू झालेला आशिया चषक 2022 चा हंगाम लवकरच संपणार आहे. रविवारी (11 सप्टेंबर) पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात आशिया चषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

श्रीलंकेने आतापर्यंत 5 वेळा आशिया चषक जिंकला आहे. तर पाकिस्तानला 2 वेळा विजेतेपद मिळवता आले आहे. अशात उभय संघ आणखी एकदा चषकावर नाव कोरण्यासाठी प्रयत्नशील असतील. तत्पूर्वी आशिया चषकाच्या विजेत्या आणि उपविजेत्या संघांना किती बक्षिस रक्कम मिळेल? (Asia Cup 2022 Prize Money) याबद्दल जाणून घेऊ…

आशिया चषकाच्या चालू हंगामाची सुरुवात 27 ऑगस्टला झाली होती. यंदाचे सर्व सामने खूप रोमांचक राहिले आहेत. दोन गटात संघ विभागले गेले होते. अ गटात आशिया चषकातील सर्वात यशस्वी भारत संघ, पाकिस्तान आणि हाँगकाँग संघ होते. तर ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश होते. बांगलादेश आणि हाँगकाँगचे संघ साखळी फेरीतूनच स्पर्धेबाहेर झाले. तर भारत आणि अफगाणिस्तान संघाचा प्रवास सुपर-4 फेरीत संपला.

आता सुपर-4 मधील पाकिस्तान आणि श्रीलंका (Pakistan vs Sri Lanka) संघ चषक जिंकण्यासाठी अंतिम सामन्यात भिडतील. हा सामना रविवारी रंगेल. हा सामना जिंकत विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला 20 हजार यूएस डॉलर मिळतील. भारतीय चलनानुसार याची किंमत 1 कोटी 59 लाख आणि 53 हजार होते. तर उपविजेत्या संघाचाही खिसा चांगलाच भरणार आहे. उपविजेत्या संघाला 10 हजार यूएस डॉलर म्हणजे 79 लाख 66 हजार रुपये मिळणार आहेत. 

आशिया चषक 2022साठी पाकिस्तानचा संघ-
मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, मोहम्मद नवाज, हसन अली, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, उस्मान कादिर, हैदर अली, शाहनवाज दहनी, शादाब खान, नसीम शाह

श्रीलंका संघ: दासुन शनाका (कर्णधार), धनुष्का गुणतिलका, पाथुम निसांका, कुसल मेंडिस, चरिथ असलांका, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, धनंजय डिसिल्वा, वानिंदु हसरंगा, महीष तीक्षणा, जैफ्री वांडेरसे, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने, दिलशान मदुशंका, मतीशा पथिराना, नुवानिदु फर्नांडो, नुवान तुषारा, दिनेश चांदीमल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---