भारतीय संघाचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या चर्चेत आहे. पाकिस्तानविरुद्ध रविवारी (28 ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयात हार्दिकचे योगदान सर्वात महत्वाचे राहिले. त्याने पहिल्यांदा गोलंदाजी आणि नंतर फलंदाजी करताना महत्वाची भूमिका पार पाडली आणि भारताला विजय मिळवून दिला. याच पार्श्वभूमीवर भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज रॉबिन उथप्पा याने त्याची तुलना माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी याच्याशी केली आहे.
रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याच्या मते एमएस धोनी (MS Dhoni) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) जवळचे मित्र आहेत. याच कारणास्तव हार्दिकला एका क्रिकेटपटूच्या रूपात खूप मदत मिळाली आहे. त्याने 2016 साली धोनीच्याच नेतृत्वात भारतीय संघासाठी पदार्पण केले होते आणि आज भारताच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे.
उथप्पा म्हणाला की, “हार्दिक एमएसचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण तो असा व्यक्ती आहे, जो त्याच्याप्रमाणेच दिसतो. तुम्ही पाहू शकता की, काही गोष्टी अशा आहेत, ज्यात तो त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्यक्षात चांगले मित्र देखील आहेत. त्यामुळेच दिसून येते की, तो त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न देखील करतो. त्याच्या खेळात धोनीप्राणेच आत्मविश्वास आहे, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहितीये.”
“आपण एका भारतीयाच्या रूपात एक म्हणू शकतो की, त्याने यामध्ये अधिक सुधारणा करावी आणि ते (फिनिशर) स्थान काबीज करावे. जर त्याने अशाच पद्धतीचे प्रदर्शन सुरू केले, तर मी नक्कीच भविष्यात त्याला एका कर्णधाराची भूमिका पार पाडताता पाहू शकतो,” असेही उथप्पा पुढे बोलताना म्हणाला.
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्याचा विचार केला, तर आशिया चषक 2022 हंगामातील भारताचा हा पहिलाचा सामना होता. कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघ 147धावांवर गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने हे लक्ष्य 5 विकेट्सच्या नुकसावर आणि 19.4 षटकात हे लक्ष्य गाठले. हार्दिक पंड्याने शेवटी विजयी षटकार मारल्यामुळे पाकिस्तानला पराभव पक्तरावा लागला. त्याने या सामन्यात तीन विकेट्स आणि 17 चेंडूत नाबाद 33धावा ठोकल्या
दरम्यान, मागच्या वर्षी टी-20 विश्वचषकातील खराब प्रदर्शनानंतर हार्दिकने मोठी विश्रांती घेतली होती. यादरम्यानच्या काळात त्याने स्वतःची फिटनेस आणि फॉर्म पुन्हा मिळवला आणि आयपीएल 2022मध्ये जोरदार पुनरागमन केले. त्याच्या नेतृत्वात पहिल्यांचा आयपीएल खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यानंतर हार्दिकसाठी भारतीय संघाचे दरवाजे पुन्हा एकदा खुले झाले. आशिया चषकातील त्याचा फॉर्म पाहता आगामी टी-20 विश्वचषकात देखील तो संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
हॉंगकॉंगला हरवण्यासाठी भारत संघात करणार ‘हा’ मोठा बदल! जाणून घ्या टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11
‘बडे *** हो बेटा!’ सारा तेंडूलकरने अनफॉलो केल्यावर शुबमन थेट ‘या’ अभिनेत्रीला घेऊन गेला डेटवर
शाहीद आफ्रिदीने गंभीरविषयी केलेल्या ‘त्या’ कमेंटवर हसला भज्जी, चाहत्यांनी धरले धारेवर