येत्या ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या आशिया चषकाच्या पंधराव्या हंगामाचे वेळापत्रक मंगळवारी (०२ ऑगस्ट) जाहीर झाले आहे. स्वत: बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी हे वेळापत्रक शेअर केले आहे. २७ ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. तर ११ सप्टेंबर रोजी आशिया चषकाचा अंतिम सामना खेळेल जाईल. हे सर्व सामने संयुक्त अरब अमिरातीत खेळवले जाणार आहेत.
भारतीय संघ २८ ऑगस्ट रोजी कट्टर प्रतिद्वंद्वी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने आशिया चषकाची सुरुवात करेल. उभय संघातील सामना दुबईत होईल. पुढे ३१ ऑगस्ट रोजी दुबईतच त्यांचा दुसरा सामना होईल. आशिया चषकासाठी पात्र ठरणाऱ्या संघासोबत त्यांची लढत होईल. दुसरीकडे आशिया चषकातील पहिला सामना २७ ऑगस्टला श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघात खेळला जाईल.
आशिया चषकातील सहभागी संघांना २ गटात विभागले गेले आहे. भारतीय संघ आशिया चषकातील गट अ चा भाग आहे. भारताबरोबरच पाकिस्तान आणि क्लालिफाय होणारा संघही या गटाचा भाग असेल. तर ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांचा समावेश आहे.
The wait is finally over as the battle for Asian supremacy commences on 27th August with the all-important final on 11th September.
The 15th edition of the Asia Cup will serve as ideal preparation ahead of the ICC T20 World Cup. pic.twitter.com/QfTskWX6RD
— Jay Shah (@JayShah) August 2, 2022
भारतीय क्रिकेट संघ आशिया चषकाचा सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने आतापर्यंत ७ वेळा आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. मागील २०१८ च्या हंगामातही भारतीय संघाने अंतिम सामन्यात बांगलादेशला पराभूत करत विजेतेपद पटकावले होते.
आशिया चषक २०२२ चे वेळापत्रक:
पहिला सामना- श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान (२७ ऑगस्ट, दुबई)
दुसरा सामना- भारत विरुद्ध पाकिस्तान (२८ ऑगस्ट, दुबई)
तिसरा सामना- बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान (३० ऑगस्ट, शारजाह)
चौथा सामना- भारत विरुद्ध क्वालिफायर (३१ ऑगस्ट, दुबई)
पाचवा सामना- श्रीलंका विरुद्ध बांगलादेश (१ सप्टेंबर, दुबई)
सहावा सामना- पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर (२ सप्टेंबर, शारजाह)
सातवा सामना- बी१ विरुद्ध बी२, सुपर-४ (३ सप्टेंबर, शारजाह)
आठवा सामना- ए१ विरुद्ध ए२, सुपर-४ (४ सप्टेंबर, दुबई)
नववा सामना- ए१ विरुद्ध बी१, सुपर-४ (६ सप्टेंबर, दुबई)
दहावा सामना- ए२ विरुद्ध बी२, सुपर-४ (७ सप्टेंबर, दुबई)
अकरावा सामना- ए१ विरुद्ध बी२, सुपर-४ (८ सप्टेंबर, दुबई)
बारावा सामना- बी१ विरुद्ध ए२, सुपर-४ (९ सप्टेंबर, दुबई)
अंतिम सामना- पहिले सुपर-४ विरुद्ध दुसरे सुपर-४ (११ सप्टेंबर, दुबई)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘शराबी’ अनुष्का शर्मा! व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस
बिग ब्रेकिंग! आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर, कट्टर प्रतिस्पर्धींविरुद्ध भारत खेळणार पहिलीच लढत
VIDEO | धोनीची बरोबरी करायला निघालेला कॅरेबियन फलंदाज, अर्शदीपने उडवल्या दांड्या