---Advertisement---

Asia Cup 2022: पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी श्रीलंकेने कसली कंबर; कॅप्टन शनाका म्हणाला, ‘टॉस हरलो तरी…’

Babar-Azam-Dasun-Shanaka
---Advertisement---

आशिया चषकाच्या (Asia Cup) 15व्या हंगामातील अंतिम सामना रविवारी (11 सप्टेंबर) श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळला जाणार आहे. या मैदानावर मागील वर्षी टी20 विश्वचषक आणि इंडियन प्रीमियर लीगचे काही सामने खेळवण्यात आले. तेव्हा सामन्याचा निकाल नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेणाऱ्या संघाच्या बाजूने लागला. यामुळे या मैदानावर खेळण्यात येणाऱ्या सामन्यांमध्ये नाणेफेक महत्वाची भुमिका बजावतो.

दोन्ही संघाचे चाहते या सामन्यांसाठी उत्सुक आहेत. या महत्वाच्या सामन्याआधी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकबाबत आपापले मत व्यक्त केले आहे. श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका (Dasun Shanaka) याचे म्हणणे आहे की, त्याचा संघ अंतिम सामन्यात नाणेफेक हरला तर प्रथम फलंदाजी करण्यास तयार आहे.

श्रीलंकेच्या संघाने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चांगल्या कामगिरीसाठी ओळखली जाते. त्यांनी आशिया चषक 2014मध्ये पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. हा सामना वनडे प्रकारातील होता. तर पाकिस्तान संघ एका दशकापासून आशिया चषकाचा दुष्काळ संपवण्याच्या प्रयत्नात आहे.

या सामन्याआधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शनाका म्हणाला, “नाणेफेक ही महत्वपूर्ण आहे, तरीही आमचे फलंदाज पहिल्या आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यात उत्तम आहेत. आम्ही येथे खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग केला आहे. मात्र जर अंतिम सामन्यात आम्ही नाणेफेकीमध्ये पराभूत झालो तर पहिली फलंदाजी करण्यास तयार आहोत.”

पाकिसान क्रिकेटनेही कर्णधार बाबर आझम याचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. तो म्हणाला, अंतिम सामना चांगला होईल याची अपेक्षा आहे. आशिया चषकात सध्या ज्या संघांनी नाणेफेक जिंकत दुसऱ्या डावात फलंदाजी केली आहे ते संघ जिंकले आहेत. यामुळे नाणेफेक हा मोठा भाग ठरला आहे. तसेच वातावरण, दव आणि खेळपट्टीही येथे महत्वाचे आहेत. तसेच खेळपट्टी दुसऱ्या डावातही चांगली होती. यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांना फायदा होतो.

https://www.instagram.com/tv/CiU-FYUt0z4/?utm_source=ig_web_copy_link

आशिया चषक 2022मध्ये आतापर्यंत नाणेफेकीचे महत्वाची भुमिका पार पाडली आहे. ज्या संघांनी नाणेफेक जिंकली ते संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत सामने जिंकले आहेत. श्रीलंकेनेही सर्व सामने जिंकले असून त्यांनी या सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग केला आहे. तसेच दुबईमध्ये एकूण 83 टी20 सामने खेळले गेले आहेत. त्यातील लक्ष्याचा पाठलाग करताना संघांनी 45 सामने जिंकले आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियामध्ये ‘हा’ खेळाडू चमकणार! ‘टी-20 विश्वचषकासाठी त्याला निवडा’ – सुनील गावसकर
आशिया कपमधील अपयशानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘या’ चेहऱ्यांना मिळणार संधी; वाचा सविस्तर
स्मिथ आला फॉर्मात! दोन वर्षांनंतर झळकावलेल्या वनडे शतकासह केला मोठा पराक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---