ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघात सुरू असलेल्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना खेळला गेला. हा सामना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचचा शेवटचा वनडे सामना ठरला. ऍरॉन फिंच वनडे क्रिकेटमधून निवृत्त होणार यामुळे अनेक ऑस्ट्रेलियन चाहते नाराज होते. मात्र, त्यांना या परिस्थितीतही जल्लोष साजरा करण्याची संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने यावेळी त्याच्या वनडे कारकिर्दीतील 12वे शतक झळकावत विशेष खेळी केली.
केर्न्स येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच केवळ 5 धावांवर बाद झाल्यानंतर चाहते नाराज होते. मात्र, त्यानंतर संपूर्ण डावात स्मिथने वर्चस्व गाजवत 131 चेंडूत 105 धावांची विशेष खेळी केली. यावेळी त्याने 1 षटकार आणि 11 चौकार लगावले. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील 12 वे शतक ठरले.
या शतकी खेळी दरम्यान त्याने दिग्गजांच्या यादीत आपले नाव नोंद केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 40 शतके ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये 28 शतके आहेत. स्मिथने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 320 डावात ही कामगिरी करून दाखवली. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला आहे. आमलाने 264 डावात ही कामगिरी केलेली. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीने 40 शतकांसाठी 294 तर सचिन तेंडुलकरने 309 डाव खेळलेले. तर पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाच्याच मॅथ्यू हेडनचा क्रमांक लागतो. त्याने 40 शतकांसाठी 323 डाव खेळले होते.
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 5 बाद 267 धावा केल्या. स्मिथच्या 105 धावांसह मार्नस लाबुशेनने 52 धावांची खेळी केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पोलार्ड, रसेल अन् पूरन असूनही संघाने गमावला सामना!’ कमी धावसंख्येचा पाठलाग करण्यास फेल ठरले दिग्गज
टी20 विश्वचषकासाठी माजी दिग्गजाने निवडला भारतीय संघ! आशिया चषकात नसलेल्या ‘या’ खेळाडूंना दिलंय स्थान
आशिया चषकातील खराब कामगिरीनंतर जॉन्टी रोड्सचा भारतीय संघाला विशेष सल्ला! म्हणाला…