आशिया चषकाच्या (Asia Cup)15व्या हंगामात गतविजेत्या भारतीय संघाच्या कामगिरीवर अनेक प्रश्न निर्माण केले जात आहे. भारत सुपर फोरचे सलग दोन सामने पराभूत झाला आहे. यामुळे या महत्वाच्या स्पर्धेसाठी संघनिवड चुकली की काय अशाप्रकारच्या चर्चांना तोंड फुटले आहे. त्यातच भारताचा सलामीवीर केएल राहुल हा या स्पर्धेत धावा काढण्यात अपयशी ठरत आहे. यामुळे भारताच्या माजी खेळाडूने भारताच्या आगामी सामन्यांसाठी शिखर धवन आणि इशान किशन यांना संघात घेण्याची मागणी केली आहे.
भारताचा स्फोटक फलंदाज-सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) हा नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात उत्तम कामगिरी केली आहे. तसेच त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्येही (आयपीएल) सातत्य राखत धावा केल्या आहेत. यामुळे भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने त्याला आणि इशान किशन (Ishan Kishan) यांना ची20 संघात घ्यावे असे मत व्यक्त केले आहे.
धवनला भारताच्या कसोटी आणि टी20 संघात निवडले जात नाही. तो संघाकडून आता फक्त वनडे क्रिकेटच खेळताना दिसतो. मात्र त्याने पंजाब किंग्जकडून चांगली फलंदाजी केली होती. यावरून तो टी20 क्रिकेटमध्ये खेळण्यास पात्र आहे, हे सिद्ध होते. त्याने आयपीएल 2022च्या 14 सामन्यांत 460 धावा केल्या आहेत. त्याने 2016 ते 2022 दरम्यान झालेल्या आयपीएल हंगामांमध्ये 400पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
इशाननेही मुंबई इंडियन्सकडून खेळताना विशेष कामगिरी केली आहे. त्याने आयपीएल 2022मध्ये 14 सामन्यांत 418 धावा केल्या आहेत. त्यानेही मागील आयपीएलच्या हंगामांमध्ये उल्लेखनीय फलंदाजी केली आहे. तसेच त्याने भारताकडून 19 टी20 सामने खेळताना 543 धावा केल्या आहेत.
“शिखर धवन आणि इशान किशन यांना परत संघात आणा. धवनने धावा केल्या असून त्याच्यात सातत्यही आहे, ज्याची आवश्यकता सध्या भारतीय संघाला आहे. धवन हा आयपीएलच्या प्रत्येक वर्षी अधिक धावा करतो. यामुळे माझे मत आहे की, ज्यांनी धावा केल्या आहेत आणि ज्यांना धावा करणे माहित आहे अशांना संघात आणा,” असे हरभजनने म्हटले आहे.
भारत मंगळवारी (6 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात श्रीलंकेकडून 6 विकेट्सने पराभूत झाला. या पराभवाबरोबरच भारताच्या अंतिम फेरीत जाण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. आशिया चषकाच्या इतिहासात सर्वाधिक विजेतेपद पटकावण्यात भारत अग्रेसर आहे. भारताने आतापर्यंत सात वेळा आशिया चषक जिंकला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मास्टर क्लास सुरू! रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजसाठी सचिनने केला सरावाचा श्रीगणेशा; पाहा व्हिडिओ
बाबरचे वाजले बारा! अफगाणिस्तानविरुद्ध ‘गोल्डन डक’वर तंबूत
भारत हरला तरीही रोहित अव्वलच! सचिनला मागे टाकत ठरलाय ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय